Download App

Adipurush : ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशनची ‘आदिपुरुष’ सिनेमावर बंदी घालण्याची मागणी

Adipurush : ‘आदिपुरुष’ (Adipurush) सिनेमावर अनेक वेगवेगळ्या कारणाने टीका होत आहे. मोठ्या प्रमाणात या सिनेमाला विरोध होत आहे. या सिनेमामध्ये वादग्रस्त संवाद, संतापजनक व्हीएफक्स यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. काही हिंदू संघटनांनी (Hindu Organizations) देखील हा देवदेवतांचा अपमान असल्याचं म्हटलं आहे.

आता ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशनने (All Indian Cine Workers Association) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना पत्र लिहित सिनेमावर बंदी घालण्याची मागणी केली जात आहे. ‘हे आमचं रामायण नाही’, असं त्यांनी या पत्रात लिहिलं आहे. ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहित ‘आदिपुरुष’ सिनेमाचे प्रदर्शन थांबवण्याची विनंती केली आहे.

तसेच भविष्यात ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा सिनेमा प्रदर्शित होता कामा नये, असेही आदेश दिले आहेत. असोसिएशनने ‘आदिपुरुष’ सिनेमाचा दिग्दर्शक ओम राऊत, संवादलेखक मनोज मुंतशीर आणि यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणी केली आहे.

Manoj Muntashir: ‘आदिपुरुष’ सिनेमाचे संवाद लेखक मनोज मुंतशीर यांना मुंबई पोलिसांनी दिली सुरक्षा

नेमका काय वाद ?

‘आदिपुरुष’चे निर्माते सीतेच्या जन्माच्या ठिकाणाची नावाची दुरुस्ती करेपर्यंत हा सिनेमा चालवणार नाही, असे काठमांडूचे महापौर बलेन शाह यांनी ट्वीट केले होते. नेपाळ सरकारच्या मते, सीतेचा जन्म नेपाळच्या तराई प्रदेशातील जनकपूर या गावी झाला होता. तर भारतात सीतेचा जन्म सीतामढी इथे झाला असं सांगितले जातं.

या मुद्द्यावरून दोन्ही देशांमध्ये कायमच वाद होत आहेत. दरम्यान नेपाळने सिनेमावर बंदी घातल्यानंतर ‘आदिपुरुष’चे निर्माते याबद्दल कोणता निर्णय घेतात, नेपाळमध्ये इतर भारतीय सिनेमावरील बंदी हटवली जाईल का? हे येत्या काळामध्ये समजणार आहे.

Tags

follow us