Download App

Adipurush Box Office: सिनेमाच्या कमाईला ब्रेक; रिलीजच्या चौथ्या दिवशी आदिपुरुषच्या कमाईत मोठी घसरण

 

Adipurush Box Office Collection Day 4 : ओम राऊत (Om Raut) दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ (Adipurush) हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. 16 जून 2023 रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. रिलीजच्या चार दिवसांत या सिनेमाने 375 कोटींची कमाई केली आहे.

‘आदिपुरुष’ सिनेमाने सोमवारी किती कमाई केली, त्याबद्दलचे आकडे समोर आले आहेत. त्यानुसार चौथ्या दिवशी सिनेमाच्या कलेक्शनमध्ये मोठी घट झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सिनेमाने सर्व भाषांमध्ये देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर फक्त २० कोटी रुपयांची कमाई केली आहे. हिंदी भाषेत सोमवारी १० कोटी रुपयांची कमाई झाल्याचे सांगितले जात आहे. सिनेमाचे भारतातील ४ दिवसांचे एकूण कलेक्शन २४१.१० कोटी रुपये इतके झाले आहे. सिनेमा समीक्षक तरण आदर्श यांनी देखील ट्वीट करत सिनेमाच्या कमाईत सोमवारी मोठी घट झाल्याचे सांगितले आहे.

Ketaki Chitale: केतकी चितळे वादग्रस्त पोस्टमुळे पुन्हा चर्चेत, आता नेमके काय झाले?

रविवारी ६९.१० कोटी रुपये कमावणाऱ्या ‘आदिपुरुष’च्या कमाईमध्ये सोमवारी तब्बल ५० कोटी रुपयांची घट झाली आहे. यामुळे पुढचा वीकेंड येईपर्यंत हा सिनेमा थिएटर्समध्ये दिसणार की चाहते त्याकडे पाठ फिरवणार हे येत्या काळातमधेच कळणार आहे. दरम्यान ओम राऊत दिग्दर्शित या सिनेमात प्रभास, क्रिती सेनॉन, सैफ अली खान व देवदत्त नागे यांच्या प्रमुख भूमिकेत आहेत.

Manoj Muntashir: ‘आदिपुरुष’ सिनेमाचे संवाद लेखक मनोज मुंतशीर यांना मुंबई पोलिसांनी दिली सुरक्षा

नेमका काय वाद ?

‘आदिपुरुष’चे निर्माते सीतेच्या जन्माच्या ठिकाणाची नावाची दुरुस्ती करेपर्यंत हा सिनेमा चालवणार नाही, असे काठमांडूचे महापौर बलेन शाह यांनी ट्वीट केले होते. नेपाळ सरकारच्या मते, सीतेचा जन्म नेपाळच्या तराई प्रदेशातील जनकपूर या गावी झाला होता. तर भारतात सीतेचा जन्म सीतामढी इथे झाला असं सांगितले जातं.

या मुद्द्यावरून दोन्ही देशांमध्ये कायमच वाद होत आहेत. दरम्यान नेपाळने सिनेमावर बंदी घातल्यानंतर ‘आदिपुरुष’चे निर्माते याबद्दल कोणता निर्णय घेतात, नेपाळमध्ये इतर भारतीय सिनेमावरील बंदी हटवली जाईल का? हे येत्या काळामध्ये समजणार आहे.

Tags

follow us