Adipurush : राम नवमीच्या दिवशी ‘आदिपुरुष’ (Adipurush ) या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं होतं, पण यावर अनेक लोक आक्षेप घेत असल्याचे दिसून येत आहे. (Adipurush New Poster Controversy) ‘आदिपुरुष’ या चित्रपटाचं पोस्टरनंतर टीझर आता वादात सापडला आहे. (Adipurush New Poster) या चित्रपटाने पोस्टर प्रदर्शित झाल्यापासून नेटकऱ्यांनी यावर जोरदार संताप व्यक्त करत आहेत. आता तर या पोस्टरवर आक्षेप घेत अनेक ठिकाणी तक्रार दाखल करण्यात येत आहे.
‘आदिपुरुष’च्या नवीन पोस्टरविरोधात मुंबई उच्च न्यायालयाचे वकील आशिष राय आणि पंकज मिश्रा यांच्यामार्फत ही तक्रार दाखल करण्यात आली. चित्रपट निर्मात्याने ‘रामचरितमानस’ या हिंदी धार्मिक पुस्तकामधील पात्रांना चुकीच्या पद्धतीने दाखवल्याचे तक्रारीत सांगितले आहे. ‘आदिपुरुष’ या बॉलिवूड चित्रपटाच्या नव्याने प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये हिंदू धर्मीय समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या असल्याचे सांगण्यात येत आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम २९५ (अ), २९८, ५००, ४३ अंतर्गत FIR दाखल करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार चित्रपटाचा दिग्दर्शक ओम राऊत, निर्माते भूषण कुमार आणि कलाकारांच्या नावे मुंबईतील साकीनाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. स्वतःला सनातन धर्माचा प्रचारक म्हणवणारे संजय दीनानाथ तिवारी यांनी ही तक्रार केली. या चित्रपटाच्या पोस्टर आणि टीझरमुळे हिंदू धर्माच्या भावना दुखावल्या गेल्याचे तक्रारीत सांगितले आहे.
रिलीज झालेल्या पोस्टरमध्ये क्रिती सेनॉनच्या केसाच्या भांगात कुंकू नाही, यामुळे तिला अविवाहित स्त्री दाखवण्यात आले आहे. बॉलिवूड चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेत्यांनी हे जाणूनबुजून केले आहे, असे तक्रारीत सांगण्यात आले आहे. तसेच असं करून ते सनातन धर्माचा अपमान केल्याचं म्हंटले जात आहे. हे अत्यंत निंदनीय आहे. ‘आदिपुरुष’च्या पोस्टरात हिंदू धर्माचा अपमान करण्यात आला. यामुळे भविष्यात देशातील विविध राज्यांमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेला नक्कीच धोका निर्माण होऊ शकणार आहे, असे तक्रारीत सांगितले आहे.
हिंदू धर्माचा पवित्र ग्रंथ ‘रामचरितमानस’ या मर्यादा पुरुषोत्तम श्री राम यांच्या चरित्रावर ‘आदिपुरुष’ हा बॉलीवूड चित्रपट बनवण्यात आल्याचे तक्रारीत सांगितले आहे. “सनातन धर्म गेल्या युगांपासून ‘रामचरितमानस’ या पवित्र ग्रंथाचे पालन करत आहे. त्यामधील उल्लेखानुसार हिंदू धर्मात मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री राम आणि इतर सर्व पात्रांचे विशेष महत्त्व आहे. ‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या पोस्टरमध्ये रामायणात सर्व कलाकारांना जाणीवपूर्वक चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आले आहे. असे तक्रारकर्त्याने सांगितले आहे.