Adipurush : आदिपुरुष’ (Adipurush ) सिनेमा प्रदर्शित होताच मोठ्या वादात अडकला आहे. सिनेमातील संवाद, व्हीएफएक्स तसेच प्रभास, सैफ अली खान आणि क्रिती सेनॉन यांच्या लूकवरून नेटकरी नाराजी व्यक्त करत आहेत. एवढंच नाही तर या सिनेमाविरोधात हिंदू सेनेच्या वतीने दिल्ली उच्च न्यायालयामध्ये (Delhi High Court) जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. सिनेमावरून पहिल्या दिवशी मोठा वाद सुरू झाला आहे.
यातच आता सिनेमाचे लेखक मनोज मुंतशीर (Adipurush Writer Manoj Muntashir) यांनी हनुमानाबद्दल केलेल्या खळबळजनक विधानवरून नवीन वादाची ठिणगी पडली आहे. ‘आदिपुरुष’च्या संवाद आणि दृश्यांवरून बराच मोठा गदारोळ सुरु झाला होता. विशेषत: हनुमानाच्या व्यक्तिरेखेसाठी लिहिलेल्या संवादांवरून चाहत्यांनी मोठी नाराजी व्यक्त केली होती. सिनेमात हनुमानाच्या तोंडी “तेल तेरे बाप का, कपडा तेरे बाप का, जलेगी भी तेरे बाप की” असे म्हणताना दाखवण्यात आले आहे.
या संवादांवर स्वत:चा बचाव करत असताना मनोज मुंतशीर यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलत असताना यावर स्पष्टीकरण दिले आहे. परंतु आता मनोज यांच्या नव्या दाव्यामुळे एक मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवला आहे. मनोज मुंतशीर म्हणाले की, “सोप्या भाषेमध्ये लिहिण्या पाठीमागील आमचे एक ध्येय होते, ते म्हणजे बजरंगबली, ज्याला आपण शक्ती, बुद्धिमत्ता आणि विद्येची देवता मानतो. ज्या हनुमानाकडे डोंगरासारखे बळ आहे, ज्याचा वेग शेकडो घोड्यांचा आहे.
Manoj Muntashir: ‘आदिपुरुष’ सिनेमाचे संवाद लेखक मनोज मुंतशीर यांना मुंबई पोलिसांनी दिली सुरक्षा
तो हनुमान लहान मुलासारखा आहे. त्याचा बालसुलभ स्वभाव असा आहे की तो हसतो, तो श्रीरामांसारखा बोलत नाही, तो तात्त्विक बोलत नाही, हनुमान हा देव नाही, तो भक्त आहे. त्याच्या भक्तीत शक्ती होती म्हणून आपण त्याला नंतर देव बनवले आहे. मनोज मुंतशीरची ही मुलाखत बघून लोक आणखी संतप्त झाले असल्याचे दिसून येत आहे. अनेकांनी त्यांना यापुढे मुलाखत न देण्याचा सल्ला दिला आहे. आदिपुरुष’ १६ जून रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला आणि तेव्हापासून या सिनेमावर बंदी घालण्याची मागणी होत आहे.
नेपाळने हा सिनेमाचं नाही तर इतर हिंदी सिनेमाच्या प्रदर्शनावर बंदी घातली आहे. हा वाढता वाद बघता सिनेमा आणि टी-सीरिजच्या निर्मात्यांनी नेपाळच्या महापौरांना पत्र लिहून माफी मागितली आहे. ‘आदिपुरुष’मध्ये प्रभासने रामाची, कृती सेननने सीतेची आणि देवदत्त नागेने हनुमानाची भूमिका साकारली आहे. तर सैफ अली खानने रावणाची भूमिका साकारली आहे.