Download App

चित्रपटसृष्टीतील योगदानासाठी Aditi Rao Hydari अनोख्या सन्मानाने सन्मानित

  • Written By: Last Updated:
Image Credit: Letsupp

Aditi Rao Hydari : अभिनेत्री अदिती राव हैदरी (Aditi Rao Hydari) तिच्या अभिनयाने प्रेक्षकांवर छाप पाडलेली आहे. तिच्या या कामामुळे तिच्या चित्रपटसृष्टीतील योदानासाठी तिला एका अनोख्या सन्माने सन्मानित करण्यात आले आहे. अदितीला डिस्टिंक्टिव इंटरनॅशनल अरब फेस्टिव्हल अवॉर्ड्स (DIAFA) 2023 मध्ये सन्मानित करण्यात आले आहे. हा पुरस्कार मिळणे अदितीची महत्त्वपूर्ण कामगिरी आहे.

अ‍ॅक्शन सीन्सचा थरार, रोमँटिक अंदाज अन्…; प्रियांशु पैन्युलीच्या ‘शेहर लखोत’ चा ट्रेलर आउट

तर हा 2023 चा पुरस्कार दिग्गज इजिप्शियन अभिनेत्री फतेन हमामा यांना समर्पित करण्यात आला होता. तिच्या या पुरस्कारामुळे तिचं आंतरराष्ट्रीय पातळीवर पुन्हा एकादा ओळख निर्माण झाली आहे. अदिती संजय लीला भन्साळी यांच्या हीरामंडीमध्ये पडद्यावर दिसणार असून लवकरच नेटफ्लिक्सवर येणाऱ्या विजय सेतुपती आणि अरविंद स्वामी यांच्यासोबत ‘गांधी टॉक्स’ या मूक चित्रपटात देखील दिसणार आहे. तिच्या भविष्यातील प्रकल्पांमध्ये पहिला इंडो-ब्रिटिश सहयोगी उपक्रम सिंहाचा समावेश आहे.

‘आडनावाला पाटील लावायचं अन् मागास म्हणायचं’; सुषमा अंधारेंच्या निशाण्यावर नेमकं कोण?

तर या पुरस्कार सोहळ्यात अदितीसोबत तुर्की सुपरस्टार बुराक डेनिज, ‘द इंटरव्ह्यूअर ऑफ द फेमस’ म्हणून ओळखले जाणारे ब्रिटीश-सीरियन पत्रकार अदनान अलकातेब, अल्जेरियन रॅपर आणि गायक सोलकिंग, लेबनीज स्टार्स कॅरोल समहा आणि पामेला एल किक, सौदी टीव्ही व्यक्तिमत्व एलहम अली, अदितीसह इतर प्रसिद्ध नावे होती. मोरोक्कन गायक साद लामजारेड, इजिप्शियन अभिनेत्री नादिया एल्गेंडी आणि मोना झाकी, कुवैती गायक महमोद अल्तुर्की, यूएई कलाकार फातमा लुटाह, पाकिस्तानी गायक-अभिनेता अली जफर. भारतीय अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस आणि नर्गिस फाखरी यांनाही त्यांच्या आपापल्या योगदानासाठी सन्मानित करण्यात आले.

20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान गोव्यामध्ये मानाचा इफ्फी (IFFI) म्हणजेच इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हल ऑफ इंडिया चित्रपट महोत्सव सुरू असणार आहे. या दरम्यान अनेक चित्रपटांची चर्चा होत असताना त्यात अदिती राव हैदरी या अभिनेत्रीची तेवढीच चर्चा होत आहे. याचं कारण म्हणजे या चित्रपट महोत्सवामध्ये या अभिनेत्री दुहेरी भूमिकेत आहे. तिचा एक मुकपट आला आहे. ज्याचं स्पेशल स्क्रनिंग या महोत्सवात झालं आहे. तर दुसरीकडे ती एका आंतरराष्ट्रीय चित्रपटात काम करणार आहे. त्याची घोषणा देखील यामध्ये झाली आहे.

Tags

follow us

वेब स्टोरीज