IFFI मध्ये अदितीचाच बोलबाला; एक मुकपट तर एका आंतरराष्ट्रीय चित्रपटात झळकणार

IFFI मध्ये अदितीचाच बोलबाला; एक मुकपट तर एका आंतरराष्ट्रीय चित्रपटात झळकणार

IFFI : 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान गोव्यामध्ये मानाचा इफ्फी (IFFI) म्हणजेच इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हल ऑफ इंडिया चित्रपट महोत्सव सुरू असणार आहे. या दरम्यान अनेक चित्रपटांची चर्चा होत असताना त्यात अदिती राव हैदरी या अभिनेत्रीची तेवढीच चर्चा होत आहे. याचं कारण म्हणजे या चित्रपट महोत्सवामध्ये या अभिनेत्री दुहेरी भूमिकेत आहे. तिचा एक मुकपट आला आहे. ज्याचं स्पेशल स्क्रनिंग या महोत्सवात झालं आहे. तर दुसरीकडे ती एका आंतरराष्ट्रीय चित्रपटात काम करणार आहे. त्याची घोषणा देखील यामध्ये झाली आहे.

IFFI मध्ये अदितीचाच बोलबाला…

फिल्म फॅसिलिटेश युके आणि भारत हे संयुक्तरित्या एका चित्रपटाची निर्मिती करत आहेत. अशा प्रकारे फिल्म फॅसिलिटेश युके आणि भारत यांचा संयुक्तरित्या हा पहिलाच चित्रपट आहे. त्यामध्ये अभिनेत्री अदिती राव हैदरी आणि इंग्लिश अभिनेत्री पेज संधू यांच्या मुख्य भूमिका असणार आहेत. ‘लिओनेस’ असं या चित्रपटाचं नाव आहे. दरम्यान या चित्रपटाची घोषणा इफ्फीमध्ये करण्यात आली. तसेच यासाठी एक पॅनल डिस्कशन देखील ठेवण्यात आलं होतं. त्यामध्ये अदितीने सहभाग घेतला होता.

भारतीय वायुसेनेत 317 जागांसाठी भऱती, 1 लाख 77 हजार रुपये पगार, कोण करू शकतं अर्ज?

या चित्रपटाचे दिग्दर्शक हे कजरी बब्बर हे आहेत तर निर्माते शहनाब आलम हे आहेत. तर या चित्रपट महोत्सवामध्ये या चित्रपटाचे पोस्टर देखील लॉंन्च करण्यात आले. तसेच या चित्रपटाची आणखी एक खासियत म्हणजे या चित्रपटातून प्रसिद्ध संगीतकार ए आर रहमान यांची मुलगी खातिजा रहमान ही संगीत क्षेत्रात पदार्पण करणार आहे.

Rohit Pawar : केवळ अस्मितेच्या गप्पा मारू नका; उद्योगांवरून रोहित पवारांचा सरकारवर निशाणा

दुसरीकडे अदितीचा आणखी एक चित्रपट या महोत्सवात दिसणार आहे. खरंतर या चित्रपटाचा टीझर गेल्या वर्षी गांधी जयंतीच्या निमित्ताने रिलीज करण्यात आला होता. त्यानंतर या चित्रपटाची प्रचंड चर्चा झाली कारण हा एक मूकपट असणार आहे. मराठी असलेल्या किशोर बेळेकर यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. तर दाक्षिणात्य सुपरस्टार विजय सेतुपती यांच्यासह अदितीराव हैदरी, सिद्धार्थ जाधव, अरविंद स्वामी यांच्या मुख्य भूमिका असणार आहेत. तर चित्रपटाला ए आर रहमान यांनी संगीत दिलं आहे. हा चित्रपट मूकपटासह एक लघुपट देखील असणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube