आदित्य चोप्रा अन् अली अब्बास जफर अनटायटल्ड चित्रपटासाठी पुन्हा एकत्र; अहान पांडे,शर्वरी, ऐश्वर्य ठाकरे आणि बॉबी देओल प्रमुख भूमिकेत!

Aditya Chopra : यश राज फिल्म्सने दिग्दर्शक अली अब्बास जफर यांच्या आगामी अनटायटल्ड रोमँटिक अ‍ॅक्शन ड्रामा चित्रपटाच्या प्रदर्शितीची तारीख

Aditya Chopra

Aditya Chopra

Aditya Chopra : यश राज फिल्म्सने दिग्दर्शक अली अब्बास जफर यांच्या आगामी अनटायटल्ड रोमँटिक अ‍ॅक्शन ड्रामा चित्रपटाच्या प्रदर्शितीची तारीख जाहीर केली आहे. हा चित्रपट 26 मार्च 2027 (गुड फ्रायडे) रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अहान पांडे (Ahaan Panday) ,शर्वरी (Sharvari) , ऐश्वर्य ठाकरे (Aishwarya Thackeray) आणि बॉबी देओल प्रमुख भूमिकांमध्ये झळकणार आहेत. चित्रपटाचे मोठ्या प्रमाणावर चित्रीकरण युनायटेड किंगडम (यूके) येथे करण्यात आले आहे.

हा रोमँटिक अ‍ॅक्शन ड्रामा असणार आहे.प्रेमकथा, मोठ्या प्रमाणावरील अ‍ॅक्शन आणि भावनिक कथानक यांचा संगम असेल.यशराज फिल्म्सचा 2027 मधील हा एक मोठा प्रोजेक्ट मानला जात आहे.चित्रपटाचे चित्रीकरण प्रामुख्याने युनायटेड किंगडम (UK) मध्ये करण्यात येत आहे.मे 2026 मध्ये अहान पांडे आणि शरवरी यांच्या शूटिंगदरम्यानचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई: TET पेपरफुटीतील मुख्य आरोपीला बिहारमधून अटक

आदित्य चोप्रा (Aditya Chopra) निर्मित आणि अली अब्बास जफर (Ali Abbas Zafar) दिग्दर्शित हा चित्रपट त्यांच्या निर्माते-दिग्दर्शक म्हणूनच्या पाचव्या सहकार्याचा भाग आहे. याआधी त्यांनी मेरे ब्रदर की दुल्हन, गुंडे, सुलतान आणि टायगर जिंदा है या यशस्वी चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. आदित्य चोप्रा (निर्माता) आणि अली अब्बास जफर (दिग्दर्शक) यांनी एकत्र केलेला शेवटचा प्रदर्शित चित्रपट Tiger Zinda Hai (2017) हा आहे. हा चित्रपट यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली आदित्य चोप्रा यांनी निर्मित केला होता

Exit mobile version