Download App

अहमदनगर महाकरंडक 2024 : प्राथमिक फेऱ्यांना उत्साहात सुरूवात; ‘झी युवा’ असणार प्रायोजक

  • Written By: Last Updated:

अहमदनगर : नव्या वर्षात कलाकारांना ओढ लागते ती अहमदनगर महाकरंडकची (Ahmednagar Mahakarandak) अनुष्का मोशन पिक्चर्स अँड एन्टरटेनमेंट्स आणि शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फौंडेशन प्रायोजित व श्री. महावीर प्रतिष्ठान अहमदनगरकडून ही स्पर्धा आयोजित केली जाते. यंदा स्पर्धेचे 11 वे वर्ष असून, झी युवा यंदाच्या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक असणार आहेत. याआधी 2020 मध्ये झी युवा या स्पर्धेत पार्टनर म्हणून सहभागी झाले होते.

शिक्षण MBA पण, मूर्ती कलेतच शोधलं करिअर; मंदिर गर्भगृहासाठी मूर्ती कोरणारे अरुण योगीराज कोण ?

आठ शहरांत रंगणार प्राथमिक फेरी

अहमदनगर महाकरंडक 2024 ची प्राथमिक फेरी प्रमुख आठ शहरात रंगणार असून, 1 ते 10 जानेवारी 2024 दरम्यान प्राथमिक फेरी होणार आहे. तर, 18 ते 21 जानेवारीला अहमदनगरमधील माऊली सभागृहात पार पडणार आहे, अशी माहिती शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरिअल फाउंडेशनचे अध्यक्ष व अहमदनगर करंडकचे संस्थापक नरेंद्र फिरोदिया (Narendra Firodia) व श्री महावीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीपाल शिंगी यांनी दिली आहे.

कोणत्या शहरात रंगणार फेऱ्या

अहमदनगर महाकरंडक 2024 ची प्राथमिक फेरी प्रमुख आठ शहरात रंगणार असून, या स्पर्धेचे डिजिटल पार्टनर लेट्सअप आहे. तर असोसिएशन विथ आय लव्ह नगर आहे. अहमदनगर महाकरंडक 2024 ची प्राथमिक फेरी-कोल्हापूरला 1, 2 जानेवारी, पुणे 3, 4 जानेवारी, मुंबई-5, 6, 7 जानेवारी, नाशिक-8 जानेवारी अमरावती 9 जानेवारी, छत्रपती संभाजीनगर-9 जानेवारी, अहमदनगर-9 आणि 10 जानेवारी रोजी होणार आहे.

Hit and Run : नव्या कायद्यात नेमकं काय? का चिडलेत ट्रकचालक? जाणून घ्या, संपाचं खरं कारण

महाराष्ट्राची सर्वात मोठी एकांकिका स्पर्धा!

साडेतीनशे पेक्षा जास्त एकांकिका, आठ केंद्र हजारो कलाकार, तितकेच तंत्रज्ञ, चार दिवसांचा महाउत्सव, जबरदस्त आणि सर्वोच्च आनंदाचा क्षण म्हणजे पारितोषिक वितरण समारंभ, ही ओळख आहे . महाराष्ट्राच्या सगळ्यात मोठ्या एकांकिका स्पर्धेची’ अहमदनगर महाकरंडक’ रंगभूमीची रणभूमी! 2013 साली या स्पर्धेला सुरुवात झाली आणि अवघ्या दहा वर्षात या स्पर्धेने महाराष्ट्रातच नाही तर देशाच्या बाहेरसुद्धा आपला लौकिक पोहोचवला आहे. म्हणूनच, या स्पर्धेमध्ये गतवर्षी थेट अमेरिकेहून ऑनलाईन पद्धतीने एकांकिका सादर झाली.

या स्पर्धेसाठी ही अत्यंत गौरवाची गोष्ट होती. पण हे सगळं घडतंय ते या स्पर्धेसाठी येणाऱ्या असंख्य कलाकारांमुळे, रसिकांमुळे, आणि अनेक मान्यवरांच्या आशीर्वादामुळे म्हणूनच अल्पावधीतच या स्पर्धेने सांस्कृतिक क्षेत्रात स्वतःचा एक मानबिंदू निर्माण केला आहे. स्पर्धा कशी असावी? तर अहमदनगर महाकरंडक सारखी असं आज प्रत्येक जण म्हणतो ते कदाचित यामुळेच. कोणतीही गोष्ट सुरू करणे यापेक्षा ती गोष्ट सातत्याने तितक्याच दर्जेदारपणे चालू ठेवणे हे अवघड असते.

जपानला एक दोन नव्हे तब्बल 155 भूकंपाचे धक्के; 12 ठार, हजारो नागरिक स्थलांतरित

स्पर्धेमुळे कलाकारांना मिळाली नवी दिशा

या स्पर्धेने फक्त कलाकारांना त्यांचं हक्काचं व्यासपीठ मिळवून दिलं नाही तर त्याच कलाकारांना आपली स्वप्न प्रत्यक्षात साकारण्याची आणि आपल्या भविष्याला एक नवा आकार देण्याची संधी सुद्धा मिळवून दिली आहे. म्हणूनच आज अनेक कलाकार चित्रपट, मालिका आणि आणि इतर माध्यमांमध्ये जाऊ शकले त्यात या स्पर्धेचा खूप मोठा वाटा आहे. आज या स्पर्धेच्या निमित्ताने महाराष्ट्रामध्ये एका नवीन सांस्कृतिक चळवळीला सुरुवात झाली आहे. स्पर्धेसाठई आलेल्या प्रत्येक कलाकाराला सकाळचा नाष्टा, दुपारचे जेवण, रात्रीचे जेवण, यासह लांबून आलेल्या कलाकारांसाठी राहण्याची व्यवस्था सुद्धा या स्पर्धेमध्ये केली जाते.

 

follow us