आय लव्ह नगर व जय आनंद फाऊंडेशनच्या पुढाकारातून ‘अहिंसा चौका’चे सुशोभिकरण

  • Written By: Published:
आय लव्ह नगर व जय आनंद फाऊंडेशनच्या पुढाकारातून ‘अहिंसा चौका’चे सुशोभिकरण

अहमदनगर : नगर शहरातील धार्मिक परीक्षा बोर्डापुढील ईगल प्राईड जवळील चौकाचे सुशोभीकरण व उद्घाटन आय लव्ह नगर फाऊंडेशन (I Love Nagar Foundation) व जय आनंद फाऊंडेशन यांच्या वतीने काल (शनिवारी) सायंकाळी करण्यात आले. या चौकाला ‘अहिंसा चौक’ (Ahinsa Chowk) असे नाव देण्यात आले आहे.

‘एमआयडीसीतील उद्योजकांना जिल्हाधिकाऱ्यांचा जाच…’, आमदार लंकेचे थेट मुख्यमंत्र्यांना पत्र 

मंदारबुवा रामदासी महाराज आणि ‘आय लव्ह नगर’चे संस्थापक व उद्योजक नरेंद्र फिरोदिया (Narendra Firodia) यांच्या हस्ते या चौकाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार संग्राम जगताप हे होते

अहिंसा चौकात सवत्स गायीची सुंदर मूर्ती बसवण्यात आली आहे. या मूर्तीच्या चारही बाजूंनी गोमुख कारंजा आहे. या पांढऱ्या रंगाच्या कारंजामुळे या रस्त्याची शोभा वाढली आहे. या कार्यक्रमाला नगरचे उपमहापौर गणेश भोसले, महापालिकेतील महिला बालकल्याण समितीच्या उपाध्यक्षा मीना चोपडा, नगरसेवक प्रकाश भागानगरे, विपुल शेटिया, जय आनंद फाउंडेशनचे संस्थापक कमलेश भंडारी, जय आनंद फाउंडेशनचे अध्यक्ष रितेश पारख, शिल्पकार विकास कांबळे, ए.पी. सोनीमंडलेचा, प्रितेश कांकरिया, राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे शहर जिल्हाध्यक्ष माणिक विधाते, महिला शहर जिल्हाध्यक्षा रेश्मा आठरे आदी मान्यवर उपस्थित होते.

छगन भुजबळांची मनोज जरांगेंवर टीका, ओबीसी-मराठा वादाला हिंगोलीतून फोडणी? 

यावेळी बोलतांना संग्राम जगताप म्हणाले, बुरुडगाव रोडवरील अहिंसा चौकात एक भव्य गायवासरु पुतळा व कारंज्याचे अनावरण करण्यात आले. हे काम आय लव्ह नगर फाऊंडेशन आणि जय आनंद फाउंडेशनतर्फे करण्यात आले. अनेक शहरांमध्ये चौकांचे सुशोभिकरण करण्यात येते. मात्र, नगर शहरात अशा चौकाच्या सुशोभिकरणासाठी फारसे लोक पुढे आले नाहीत. मात्र, आज आय लव्ह नगर फाऊंडेशनचे नरेंद्र फिरोदिया आणि जय आनंद फाऊंडेशनचे कमलेश भंडारी यांनी पुढाकार घेतला. एक चांगला रस्ता तयार होत असताना चौकाचे चांगले सुशोभीकरण झाले पाहिजे, ही संकल्पना त्यांनी मांडली. अहिंसा चौक सुशोभिकरणातून चांगले काम नगरमध्ये झाले. गोमातेच्या रक्षणाचा संदेश या चौक सुशोभिकरणातून दिला जाणार आहे. आय लव्ह नगर फाऊंडेशन व जय आनंद फाऊंडेशनतर्फे चौक सुशोभिकरणाच्या कामाचे अनुकरण सर्व संस्थांनी करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube