Download App

Ajay Devgn Injured: ‘सिंघम अगेन’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अजय देवगण जखमी

Ajay Devgn Injured : बॉलिवूड अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn) म्हणजेच चाहत्यांचा लाडका सिंघम (Ajay Devgn Injured) त्याच्या आगामी सिनेमा ‘सिंघम अगेन’ (Singham Again) जोरदार चर्चेत आहे. या सिनेमातील कलाकारांचे पोस्टर आऊट झाल्यापासून ‘सिंघम’चे चाहते या सिनेमाची मोठ्या आतुरतेने वाट बघत आहेत. आता या सिनेमाच्या शूटिंगच्या दरम्यान अजय देवगण गंभीर जखमी झाला आहे.


अॅक्शन सीक्वेंसदरम्यान त्याला दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे. अजय देवगण सध्या त्याच्या आगामी ‘सिंघम अगेन’ या सिनेमाचं शूटिंग करत आहे. या सिनेमाच्या शूटिंगच्या दरम्यान तो गंभीर जखमी झाला आहे. या सिनेमाच्या अॅक्शन सीक्वंसच्या शूटिंगवेळेस अभिनेत्याला गंभीर दुखापत झाली.

बॉलिवूडचा लोकप्रिय सिने-दिग्दर्शक रोहित शेट्टी आणि त्याची टीम सध्या त्याच्या आगामी ‘सिंघम अगेन’ (Singham Again) या सिनेमाचं शूटिंग मुंबई परिसरात करत आहेत. दरम्यान अॅक्शन सीन शूट करत असताना अजय देवगणच्या डोळ्याला दुखापत झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार अजय देवगण एक कॉम्बैट सीक्वेंस शूट करत होता. त्यावेळी त्याच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली.डोळ्याला दुखापत झाल्यानंतर अजय देवगणने काही वेळ ब्रेक घेतला होता. सेटवर डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार केले आहे.

‘डान्स प्लस’चे सातवे पर्व लवकरच; रेमो डिसूझासोबत रुपाली गांगुली दिसणार परीक्षकाच्या भूमिकेत

दरम्यान रोहितने खलनायकांवर आधारित असलेल्या काही दृश्यांचं शूटिंग पूर्ण केलं आहे. ‘सिंघम अगेन’ या सिनेमाचं शूटिंग गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. रोहित शेट्टी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहे. या सिनेमात अजय देवगण मुख्य भूमिकेत आहे. अजयसह करीना कपूर खान, दीपिका पादुकोण, रणवीर सिंह आणि अक्षय कुमारदेखील या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

Tags

follow us

वेब स्टोरीज