‘डान्स प्लस’चे सातवे पर्व लवकरच; रेमो डिसूझासोबत रुपाली गांगुली दिसणार परीक्षकाच्या भूमिकेत

‘डान्स प्लस’चे सातवे पर्व लवकरच; रेमो डिसूझासोबत रुपाली गांगुली दिसणार परीक्षकाच्या भूमिकेत

Dance Plus New Season: देशातील सर्वात लोकप्रिय डान्स रिअ‍ॅलिटी शो ‘Dance Plus’द्वारे (Dance Plus ) पुनरागमन करणार आहे. हा शो देशातच नाही तर जगभरात खूप प्रसिद्ध आहे. (Dance Plus New Season 7) कोरिओग्राफर-दिग्दर्शक रेमो डिसूझा (Remo D’Souza) पुन्हा एकदा हा शो घेऊन येणार आहेत. स्टार प्लसवर या वहिनी वर प्रसारित होणारा ‘डान्स प्लस’ हा नृत्यावर आधारित रिअ‍ॅलिटी शो आहे, देशभरातून हजारो नृत्यप्रेमींना त्यांचे नृत्यकौशल्य दाखवण्याची संधी आतापर्यंत या शोच्या माध्यमातून मिळत आहे. आता या रिअ‍ॅलिटी शोचा सातवा सीझन लवकरच सुरू होणार आहे. प्रेक्षकांची आवडती रुपाली गांगुली उर्फ ​​अनुपमाही वाईल्ड कार्ड जजच्या भूमिकेत रेमो डिसूझासोबत स्टेजवर दिसणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by StarPlus (@starplus)


डान्स प्लस हा एक डान्स रिअ‍ॅलिटी शो आहे, जो सुरुवातीच्या काळापासूनच चाहत्यांमध्ये खूपच लोकप्रिय आहे. नव्या जोमामध्ये आता चाहत्यांचा आवडता रिअ‍ॅलिटी शो त्याचा सातवा सीझन लवकरच बघायला मिळणार आहे. या शोच्या शेवटच्या सीझनने चाहत्यांना त्यांच्या पडद्यावर खिळवून ठेवले जाणार आहे. अशा परिस्थितीत सर्वजण नवीन सीझनची मोठ्या आतुरतेने वाट बघत आहेत, मात्र हा शो कधी सुरू होणार याची माहिती वाहिनीने अद्याप स्पष्ट केली नाही.

3 जुलै 2015 रोजी डान्स प्लसचा पहिला सीझन चाहत्यांच्या भेटीला आला. आणि बघता बघता आतापर्यंत या शोचे अनेक सीझन रिलीज झाले आहेत. डान्स प्लसच्या सातव्या सीझनची घोषणा झाली आहे, मात्र हा शो नेमक कधी प्रसारित होणार आहे. हे आणखी गुपितचं ठेवण्यात आहे आहे, पण लवकरच या शोचा सातवा सीझन चाहत्यांच पुन्हा एकदा मनोरंजन करण्यासाठी येणार आहे. या शोबद्दल अगोदर माहिती समोर आली होती की, हा शो जुलै किंवा ऑगस्टमध्ये सुरू होऊ शकतो, मात्र तेव्हा हा शो सुरू होऊ शकला नाही.

Animal Day 3: ‘अ‍ॅनिमल’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; रविवारी प्रेक्षकांची तिकीटबारीवर गर्दी

मिळालेल्या माहितीनुसार, या शोमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांच्या निवड प्रक्रियेसाठी 25 सप्टेंबरपासून ऑडिशन्स सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे. डान्स प्लसमध्ये सहभागी होण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून अनेक स्पर्धकांची निवड केली जाते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube