Singham Again: सिंघम परत येतोय… रोहित शेट्टीच्या ‘सिंघम 3’ची झलक पाहिलीत का?

Singham Again: सिंघम परत येतोय… रोहित शेट्टीच्या ‘सिंघम 3’ची झलक पाहिलीत का?

Singham 3 Movie: बॉलिवूडचा (Bollywood) सुप्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी (Rohit Shetty) आता त्याच्या आगामी ‘सिंघम 3’ (Singham 3) या सिनेमामुळे जोरदार चर्चेत आला आहे. या सिनेमाची घोषणा झाल्यापासून चाहत्यांमध्ये चांगलीच उत्सुकता लागल्याचे बघायला मिळत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rohit Shetty (@itsrohitshetty)


या सिनेमाबद्दल सध्या नवीन अपडेट समोर आल्याने चाहते खूपच आनंदी झाल्याचे बघायला मिळत आहेत. आतापर्यंत ‘सिंघम 3’ सिनेमातील दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि टायगर श्रॉफचा पहिला लूक समोर आला आणि तो सर्वांना खूपच आवडला होता.

रोहित शेट्टी सध्या ‘सिंघम 3’ च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या फ्रँचायझी सिनेमाच्या पहिल्या आणि दुसऱ्या भागासारखे तिसऱ्या भागात देखील अजय देवगण मुख्य भूमिकेमध्ये बघायला मिळणार आहे. ‘सिंघम 3’ या सिनेमामध्ये अजयसोबत टायगर श्रॉफ आणि अक्षय कुमार देखील बघायला मिळणार आहे. नुकताच रोहित शेट्टीने ‘सिंघम 3’ सिनेमाच्या शूटिंग सेटवरून एक झलक दाखवल्याने चाहत्यांची या सिनेमाबद्दल उत्सुकता आणखीनच वाढली आहे. रोहित शेट्टीने सोशल मीडियावर सिनेमाच्या सेटवरील काही फोटो शेअर केले आहे. जे सध्या सोशल मीडियावर सध्या चर्चचा विषय बनला आहे.

रोहित शेट्टीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून ‘सिंघम 3’ सिनेमाच्या शूटिंगमधील दोन फोटो शेअर केले आहेत. या फोटोत कार आणि ट्रकला आग लागल्याचे बघायला मिळत आहे. सिनेमाच्या शूटिंगमधील फोटोंसोबत त्याने ‘सिंघम अगेन’ असा हॅशटॅग देखील वापरला आहे. तसेच ‘वर्क इन प्रोग्रेस…’ असे लिहल्याचे बघायला मिळत आहे. ‘सिंघम 3’ सिनेमाच्या शूटिंगमधील काही फोटो पाहून चाहत्यांना आता या सिनेमाबद्दल उत्सुकता लागली आहे.

Animal : लग्नानंतरच्या नौकझौकीची झलक! रणबीर-रश्मिकाच्या अॅनिमलचं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

‘सिंघम 3’ हा सिनेमा 2024 मध्ये ओर्दर्शीत करण्यात येणार आहे. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा 2’ सिनेमाशी टक्कर देणार आहे. रोहित शेट्टीच्या दिग्दर्शनाखाली तयार होत असलेल्या ‘सिंघम 3’ या सिनेमात अजय देवगण, करीना कपूर, दीपिका पदुकोण, टायगर श्रॉफ हे मुख्य भूमिकेमध्ये बघायला मिळणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube