Download App

रिलीज आधीच Shaitaan हाऊसफुल्ल? आतापर्यंत झालं इतकं अँडवान्स बुकींग

Shaitaan Box Office Prediction: चाहते अजय देवगण (Ajay Devgan) आणि आर माधवन (R Madhavan) यांच्या शैतान (Shaitaan Movie) या हॉरर चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून सर्वजण त्याच्या सिनेमाच्या रिलीजची वाट पाहत होते. या चित्रपटात आर माधवन सैतानाच्या भूमिकेत दिसणार आहे. याच कारणामुळे चाहत्यांमध्ये या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे.

शैतान 8 मार्चला चित्रपटगृहात प्रदर्शित होत असून या चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग (Advance Booking ) सुरू झाले आहे. ॲडव्हान्स बुकिंगमधूनही चित्रपटाने जोरदार कमाई करण्यास सुरूवात केली आहे. पहिल्याच दिवशी हा चित्रपट निम्म्या बजेटची कमाई करणार, अशी जोरदार चर्चा रंगत आहे.

शैतानमध्ये अजय देवगण, आर माधवनसोबत ज्योतिका आणि जानकी बोडीवाला महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. याचे दिग्दर्शन विकास बहल (Vikas Bahl) यांनी केले आहे. चित्रपटाची कथाही विलक्षण आहे.

सैतानच्या बजेटबद्दल बोलायचे झाले तर NDTV च्या रिपोर्टनुसार ते 60-65 कोटी आहे. Koimoi.com च्या रिपोर्टनुसार, शैतान दररोज 8-10 कोटींचा व्यवसाय करण्याची शक्यता आहे. चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग वाढत असल्याने हे आकडे आणखी वाढू शकतात. मंगळवारी ॲडव्हान्स बुकिंगमध्ये मोठी उडी होती. ॲडव्हान्स बुकिंगद्वारे या चित्रपटाने जवळपास 80 लाख रुपये कमावले आहेत.

आता खेळ सुरु! अजय देवगण आणि आर माधवनच्या ‘शैतान’च्या ॲडव्हान्स बुकिंगला सुरुवात

सैतानाच्या कथेबद्दल सांगायचे तर, यात काळी जादू दाखवण्यात आली आहे. चित्रपटात अजय देवगण आपल्या कुटुंबासोबत आनंदाने राहतो. एके दिवशी आर. माधवन त्याला मदत करण्याच्या बहाण्याने त्याच्या घरी येतो आणि आपल्या मुलीला आपल्या ताब्यात घेतो. त्यानंतर तो आपल्या मुलीला वाटेल ते करायला लावतो. यानंतर पुढे काय होते हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट पाहावी लागणार आहे. या चित्रपटात माधवनचा वेगळा अवतार पाहायला मिळणार आहे.

follow us

वेब स्टोरीज