Ajibai Jorat : पाहिलं एआय (Ai) महा बालनाट्य ‘आजीबाई जोरात’ (Ajibai Jorat) गेल्या काही दिवसांपासून राज्यातील नाट्य रसिकांमध्ये धुमाकूळ घालत आहे. या नाट्यने केवळ तीन महिन्यातच आपले 50 प्रयोग पूर्ण केले आहे. आजीबाई जोरातने आपल्या आपल्या कामगिरीच्या जोरावर प्रेक्षक, समीक्षक आणि मान्यवरांचे मने जिंकले आहे. सध्या ‘आजीबाई जोरात’ आपला सुवर्ण महोत्सव साजरा करण्याची तयारी करत आहे.
बाल प्रेक्षकांना मराठीची गोडी लावणारं, स्क्रीन मधून बाहेर काढणारं आणि पालकांनाही हवंहवसं वाटणारं हे नाटक आता वेगवेगळ्या शाळा उपक्रम म्हणून दाखवू लागल्या आहेत. शिवाय वेगवेगळ्या महोत्सवांमध्येही नाटकाला जोरदार मागणी आहे.
याबद्दल बोलताना नाटकाचे लेखक दिग्दर्शक क्षितिज पटवर्धन (Kshitij Patwardhan) म्हणाले की, “अनेक प्रेक्षकांनी उत्स्फूर्तपणे मराठीतील पहिलं ब्रॉडवे म्युझिकल अशी पावती आम्हाला दिली आहे. या नाट्यामुळे अनेक मुलांनी स्क्रीन टाईमिंग कमी करून मराठी लिहायला आणि वाचायला सुरुवात केली आहे आणि ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे असं देखील या नाटकाचे लेखक दिग्दर्शक क्षितिज पटवर्धन म्हणाले.
शिवाय अनेक पालक नाटकातील कलाकार आणि तंत्रज्ञ यांच्यासाठी भेटवस्तू, खायचे पदार्थ, पुस्तकं आपुलकीने घेऊन येतात, त्या प्रेमानेही भारावून जायला होत आहे. असेही क्षितिज पटवर्धन म्हणाले.
Vinesh Phogat : विनेश फोगट प्रकरणात मोठी अपडेट, ‘या’ दिवशी मिळणार रौप्य पदक?
मराठी रंगभूमीची ताकद सर्वदूर पोचावी म्हणून हे नाटक लवकरच पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, इतर राज्य आणि देशाबाहेरही न्यायचा आमचा मानस आहे, त्यासंदर्भात बोलणी सुरू आहेत.” येत्या 14 आणि 15 ऑगस्ट रोजी या नाटकाचे सुवर्ण महोत्सवी प्रयोग पुण्यामध्ये होणार आहेत.
मारुतीच्या कार्सवर बंपर डिस्काउंट, Wagon R खरेदीवर होणार 67 हजारांची बचत