Akanksha Dubey Suicide Case: भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबेच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास पोलीस सखोल करत आहेत. त्यातच अभिनेत्रीचा मृत्युपूर्वीचा एक व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल (Video Viral) होत आहे. (Akanksha Dubey Death) या व्हिडीओत ती खूपच हमसून रडत असल्याचे दिसून येत आहे. तसेच तिने समर सिंहवर आरोपही केले आहेत. तिचा हा रडालेला व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्रामचा (Instagram) शेवटचा लाइव्ह असल्याचा सांगण्यात येत आहे.
सध्या हा व्हिडिओ ट्विटरवर जोरदार व्हायरल होत आहे. ज्यामध्ये आकांक्षा रडत म्हणत आहे की, “मला माहीत नाही की माझ्याकडून काय चूक झाली आहे, मी या जगात राहायचं नाही. हा माझा तुमच्यासोबतच शेवटचा विषय आहे, मला काही झाले तर त्याला समर सिंह जबाबदार असणार आहे. दरम्यान, यामध्ये तिने तिला काही झाल्यास समर सिंह जबाबदार असणार असल्याचे सांगितले आहे.
यामुळे या आकांक्षाच्या मृत्यूप्रकरणात समर सिंहवरील संशय अधिक बळावला जात आहे. आकांक्षा दुबेचा आत्महत्येच्या २४ दिवसांनंतर आकांक्षाचा ३८ सेकंदांचा हा व्हिडिओ सध्या जोरदार वायरल होत आहे. त्यानंतर एकीकडे कलम ३०६ अंतर्गत एफआयआर नोंदवण्यावरून पोलिसांवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत, तर दुसरीकडे आकांक्षाची आई मधू दुबे यांनी समर सिंहचे समर्थन करणाऱ्यांवर संताप व्यक्त केला आहे.
तसेच समर सिंहने हॉटेल मॅनेजर संदीप सिंग आणि इतरांच्या मदतीने आपल्या मुलीची हत्या घडवून आणल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे. आकांक्षा दुबे प्रकरणाचा तपास सीबीआयकडे द्यावा, त्यानंतर हत्येच्या कारणांचा उलगडा होणार असल्याची, अशी विनंती आकांक्षाची आई मधु यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे केली आहे. या आत्महत्या प्रकरणात अनेक मोठी नावे समोर येणार असलयाचे सांगितले जात आहे.
दरम्यान, गुन्हे शाखेने समर सिंहला दिल्लीजवळच्या गाझियाबादमधून काही दिवसांपूर्वी अटक केली होती. आकांक्षांचा मृत्यू झाल्यापासून पोलीस त्याचा शोध घेत होते, मात्र तो गाझियाबादच्या नंदग्राम पोलीस स्टेशन हद्दीतील राजनगर एक्स्टेंशनमध्ये असलेल्या चार्म्स क्रिस्टल सोसायटीमध्ये लपला होता. सध्या तो अटकेत आहे, अशातच आकांक्षाचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
आकांक्षा दुबेच्या आईनं केलेले गंभीर आरोप
२५ वर्षीय आकांक्षा दुबे ही आगामी सिनेमाच्या शुटिंगकरिता वाराणसीला गेली होती. शुटिंगच्या दरम्यान ती सारनाथ येथील एका हॉटेलमध्ये थांबली होती. आकांक्षाने गळफास घेतल्यावर तिच्या मेकअप आर्टिस्टने तिला पहिल्यांदा त्या अवस्थेत बघितलं आणि पोलिसांना माहिती देण्यात आली. आकांशाच्या आईने समर सिंग आणि त्याचा भाऊ संजय सिंह यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
IT Raid : टी-सिरीजचे निर्माते विनोद भानुशालीसह अनेकांवर आयटीची छापेमारी
आकांशाला ब्लॅकमेल करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप आकांशाच्या आईने समर आणि संजयवर करण्यात आले आहेत. तेव्हापासून पोलीस त्यांचा शोध घेत होते. आकांक्षाच्या मृत्यूच्या एक दिवस अगोदर आकांक्षा आणि समर एका पार्टीला गेले होते, असं सांगण्यात येत आहे. 25 मार्चच्या रात्री आकांक्षा तिच्या बर्थडे पार्टीकरिता गेली होती. तेव्हा ती आनंदी होती. या पार्टीला ब्रेकअप पार्टी असे नाव देण्यात आले होते, अशी माहिती मिळाली आहे.
आकांक्षा आणि समर सिंह लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. आकांक्षा- समर यांची भेट ३ वर्षांअगोदर झाली होती, अशी माहिती मिळाली आहे. टिकटॉक आणि इनस्टाग्रामच्या माध्यमातून आकांक्षाला चांगलीच लोकप्रियता मिळाली होती. टिकटॉकवर तिचे व्हिडीओ पोस्ट केले की काही मिनिटांत व्हायरल व्हायचे. इन्स्टाग्रामवर देखील तिचे १.७ मिलियन फॉलोअर्स आहेत. आकांक्षाने वयाच्या १७ व्या वर्षी तिने मनोरंजनसृष्टीत पदार्पण केले होते. वीरों के वीर’ आणि ‘कसम पैदा करने वाले की २’ सारख्या सिनेमामध्ये काम केली आहे.