Akanksha Dubey Case: आकांक्षा दुबे प्रकरणात नवा ट्विस्ट; ‘या’ अभिनेत्रीला पोलिसांनी पाठवले समन्स

Akanksha Dubey Suicide Case: भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबे (Akanksha Dubey) आत्महत्या प्रकरणात नवीन खुलासे होत आहेत. नुकतेच वाराणसी पोलिसांनी (Varanasi Police) आकांक्षा दुबे आत्महत्या प्रकरणी अभिनेत्री अनुराधा सिंगला (Anuradha Singh) समन्स बजावले आहे. (Akanksha Dubey Case) अनुराधा सिंह यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले आहेत. आकांक्षा दुबेची आई मधू दुबे यांनी अनुराधा सिंह यांच्यावर अनेक आरोप […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 04 15T120213.235

Akanksha Dubey Case

Akanksha Dubey Suicide Case: भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबे (Akanksha Dubey) आत्महत्या प्रकरणात नवीन खुलासे होत आहेत. नुकतेच वाराणसी पोलिसांनी (Varanasi Police) आकांक्षा दुबे आत्महत्या प्रकरणी अभिनेत्री अनुराधा सिंगला (Anuradha Singh) समन्स बजावले आहे. (Akanksha Dubey Case) अनुराधा सिंह यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले आहेत. आकांक्षा दुबेची आई मधू दुबे यांनी अनुराधा सिंह यांच्यावर अनेक आरोप केले होते. पोलिस अनुराधाविरुद्ध एफआयआर नोंदवत नसल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र, आता तिला चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.

26 मार्च 2023 रोजी आकांक्षा दुबेचा मृतदेह वाराणसीतील एका हॉटेलमध्ये लटकलेल्या अवस्थेत आढळून आला, आत्महत्या केले असल्याचे पोलिसांनी सांगितले. अभिनेत्रीच्या आईने याला खून म्हटले आणि अनेकांवर तिच्या मुलीच्या हत्येचा आरोप केला, त्यापैकी एक अनुराधा होती. मिळालेल्या माहितीनुसार जेव्हा आकांक्षाच्या आईने हत्येचा गुन्हा नोंदवण्याचा प्रयत्न केला तेव्हा सारनाथ पोलिस स्टेशनने तिचा एफआयआर नोंदवला नाही. मात्र, आता या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे.

आकांक्षा दुबे प्रकरणाचे वकील शशांक शेखर त्रिपाठी यांच्या अर्जावरून वाराणसी पोलिसांनी अनुराधा सिंह यांना मुंबईतून समन्स बजावले आहे. आकांक्षा दुबे प्रकरणी लवकरच तिची चौकशी होणार आहे. आता अनुराधा यांच्या वक्तव्याने प्रकरण कोणते वळण घेते हे पाहावे लागेल. सध्या अनुराधा सिंह टीव्ही शो ‘इमली’ मध्ये दिसत आहे.


अभिनेत्री अनुराधा सिंह हे आरोप लावले

आकांक्षा दुबेच्या आईने अनुराधा सिंहवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. आत्महत्येनंतर लगेचच अनुराधा सिंह यांनी मृतदेह जाळला आणि अंत्यसंस्कारानंतर मोबाईल सोबत ठेवल्याचा आरोप मधु दुबे यांनी केला आहे. नातेवाईक आकांक्षा दुबेला फोन करत असताना ती कॉल डिस्कनेक्ट करत होती. अनुराधाने सर्व मोबाईल डेटा डिलीट केल्याचेही मधु दुबे यांनी असे आरोप लावले आहे.

Ved Movie On OOT : वेडच्या चाहत्यांना आनंदाची बातमी, वेड चित्रपट पाहा ‘या’ ओटीटीवर

आकांक्षा दुबेचा प्रियकर समर सिंगवर हे आरोप

आकांक्षा दुबे गायक समर सिंगला डेट करत होती. आत्महत्येनंतर समरवर आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप करण्यात आला आणि त्यानंतर त्याला यूपी पोलिसांनी अटक केली. सध्या तो तुरुंगात आहे.

Exit mobile version