Download App

Aakash Tosar: ‘जय शिवराय’ म्हणत निसर्गरम्य सह्याद्रीच्या धबधब्यावर आकाश ठोसरची थरारक रेलचेल

Aakash Tosar Post: ‘सैराट’ (Sairat ) फेम अभिनेता आकाश ठोसर (Aakash Tosar) म्हणजेच चाहत्यांचा लाडका परशा सध्या त्याच्या ‘बाल शिवाजी’ या आगामी सिनेमामुळे जोरदार चर्चेत येत असल्याचे दिसून येत आहे. ‘बाल शिवाजी’ (Bal Shivaji Movie) या सिनेमाचे दिग्दर्शन रवी जाधव करणार असल्याचे सांगितले जात आहे. त्याने नुकत्याच शेअर केलेल्या व्हिडीओमुळे तो आगामी सिनेमासाठी जोरदार तयारी करत असल्याचे दिसून येत आहेत. परशाने त्याच्या इन्स्टाग्रामवर (Instagram) सह्याद्रीच्या धबधब्यावर रॅपलिंग करत असल्याचा थराथर व्हिडीओ शेअर केला आहे.


या व्हिडीओमध्ये एवढ्या मोठ्या धबधब्यावर अभिनेता बिनधास्त रॅपलिंग करत असल्याचे पाहायला मिळत आहे. अभिनेता आकाशने प्रोफेशनल टीमसह सह्याद्रीतील शितकडा येथे रॅपलिंग करण्याचा अनुभव घेत असल्याचे दिसून येत आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये त्याने “जय शिवराय” असे लिहिल्याचे दिसून येत आहे. तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे व्हिडीओच्या खाली आवश्यक सेफ्टी उपकरणे आणि सुरक्षेची काळजी कशी घ्यावी याची माहिती त्याने दिले आहे.

त्यासच आकाशने पुढे लिहिले आहे की, “गिर्यारोहण हे साहसी क्षेत्र आहे. एखाद्या डोंगर सुळक्यावर ट्रेकिंग, क्लायबिंग किंवा रॅपलिंग करायची असेल तर, सर्वप्रथम एखादा रोप, Harness आणि safety equipment या साऱ्याची व्यवस्था करुन एखाद्या प्रोफेशनल टीमच्या निगराणी खाली क्लायबिंग किंवा रॅपलिंग करा. असे त्यांनी यावेळी लिहिले आहे. हा व्हिडीओ सगळ्या सेफ्टीचा उपयोग करून एका प्रोफेशनल टीमच्या निगराणी खाली बनवण्यात यावेळी सांगितला आहे. तसेच कोणत्याही धोकादायक वातावरणामध्ये प्रवेश करण्याच्या अगोदर सतत व्यावसायिक सल्ला घ्यावा. असे आकाशने त्याच्या चाहत्यांना देण्याचा प्रयत्न केला आहे.

धर्मवादावरुन Ashutosh Rana यांची परखड भूमिका; म्हणाले, “क्या खुदा ने मंदिर तोडा…”

आकाशने शेअर केलेल्या व्हिडीओवर चाहत्यांनी त्याला “काळजी घेऊन अशी साहसी कृत्ये करत जा.” असा मोलाचा सल्ला देत आहेत. तर दुसऱ्या एका चाहत्याने, “तू सेफ्टीविषयी माहिती दिलीस हे फार उत्तम केलेस..” असे सांगितले आहे. तसेच इतर काही युजर्सनी “जय शिवराय” कमेंट करत आकाशला प्रोत्साहन देण्याचे काम केले आहे. दरम्यान, लवकरच अभिनेता ‘बाल शिवाजी’ सिनेमाच्या माध्यातून चाहत्यांच्या भेटीला येणार असल्याचे सांगितले जात आहे.

Tags

follow us

वेब स्टोरीज