Marathi Theater Council नवनिर्वाचीत अध्यक्ष प्रशांत दामलेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

Prashant Damle Meet CM Eknath Shinde : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे (Akhil Bhartiya Marathi Natya Parishad) नवनिर्वाचीत अध्यक्ष प्रशांत दामले (Prashant Damle) यांनी नुकतीच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची भेट घेतली आहे. त्यांच्या भेटीचे फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. मराठी रंगभूमीवरील नामवंत कलावंत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 05 17T172933.910

Prashant Damle Meet CM Eknath Shinde

Prashant Damle Meet CM Eknath Shinde : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे (Akhil Bhartiya Marathi Natya Parishad) नवनिर्वाचीत अध्यक्ष प्रशांत दामले (Prashant Damle) यांनी नुकतीच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची भेट घेतली आहे. त्यांच्या भेटीचे फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.

एखाद्या राजकीय निवडणुकीप्रमाणे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीचे राजकारण पेटले होते. अखेर या निवडणुकीमध्ये प्रशांत दामले यांनी मोठी बाजी मारली आहे. नाट्यपरिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी आता संपली आहे. तर अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर प्रशांत दामलेंनी आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सदिच्छा भेट घेतली आहे.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी विराजमान झाल्यावर प्रशांत दामले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची देखील भेट घेतली आहे. यावेळी अजित भुरे यांच्याबरोबरच नव्या कार्यकारिणीचे सदस्य देखील हजेरी लावली आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी प्रशांत दामले यांचे अभिनंदन केले आहे.

अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर प्रशांत दामले म्हणाले होते की, आताचे सरकार हे ऐकणारे सरकार आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची देखील प्रशांत दामले भेट घेणार आहेत. शरद पवार अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे विश्वस्त आहेत. यामुळे आता अध्यक्षपदी निवड झाल्यावर ते शरद पवारांची देखील सदिच्छा भेट घेणार आहेत.

Adipurush: ‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या वादात अभिनेता प्रभासच्या पोस्टरनं वेधलं लक्ष

कोणाले कोणते पद मिळाले आहे, अध्यक्ष- प्रशांत दामले, सहकार्यवाह- समीर इंदुलकर, दिलीप कोरके, सुनील ढगे, उपाध्यक्ष – नरेश गडेकर, उपाध्यक्ष उपक्रम- भाऊसाहेब भोईर, खजिनदार- सतीश लोटके, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या 11 जणांची कार्यकारिणीवर निवड करण्यात आली आहे. यात सुशांत शेलार, गिरीश महाजन, विजय चौगुले, संजय देसाई, दीपा क्षीरसागर, सविता मालपेकर, संदीप पाटील, विशाल शिंगाडे, विजयकुमार साळुंखे, संजय रहाटे, दीपक रेगेंचा कार्यकारिणीत समावेश आहे.

Exit mobile version