मुंबई : बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार (Akshay Kumar) आजकालच्या त्याच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्याचा सेल्फी हा चित्रपट 24 फेब्रुवारी 2023 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. दरम्यान, अक्षयने एका मुलाखतीच्या वेळी आपल्या कॅनेडियन नागरिकत्वाबद्दल उघडपणे आपलं मत व्यक्त केलं आहे. भारत देश हाच माझ्यासाठी सर्व काही आहे आणि लवकरच मी कॅनेडियन नागरिकत्व सोडून देईल, असं अक्षय म्हणाला आहे.
बॉलिवूड स्टार अक्षय कुमार याला बर्याचदा आपल्या कॅनेडियन नागरिकत्वाबद्दल टीकेचा सामना करावा लागला होता. यावर बोलताना अक्षय म्हणाला की भारत त्याच्यासाठी सर्व काही आहे आणि त्याने पासपोर्टमध्ये बदल करण्यासाठी आधीच अर्ज केला आहे. तसेच अक्षयने अलीकडील एका मुलाखतीत सांगितले की जेव्हा लोक आपल्या कॅनेडियन नागरिकत्वाचे कारण जाणून घेतल्याशिवाय काही बोलतात तेव्हा आपल्याला वाईट वाटते.
अक्षय कुमार यांनी म्हटले आहे की, ‘भारत माझ्यासाठी सर्व काही आहे … मी जे काही मिळवले आहे, जे काही मला मिळाले आहे ते मला येथूनच मिळाले आहे. आणि मला परत देण्याची संधी मिळण्याचे हे माझे भाग्य आहे. जेव्हा लोक जाणून घेतल्याशिवाय काही बोलतात तेव्हा आपल्याला वाईट वाटते.
यामुळे, कॅनेडियन नागरिकत्वासाठी अर्ज केला
मुलाखतीदरम्यान अक्षय कुमारने सांगितले की, वर्ष 1990 ते 2000 मध्ये सुमारे 15 चित्रपट केले आणि सर्व सातत्याने बॉक्स ऑफिसवर वाईट रीतीने फ्लॉप झाले. ज्याचा त्याच्या कारकीर्दीवर परिणाम झाला आणि मी कॅनेडियन नागरिकत्वासाठी अर्ज केला.
टी -20 विश्वचषकातील सेमीफायनलमध्ये भारतीय महिला संघ पराभूत
मित्राने ऑफर केली होती
अक्षय म्हणाला, “माझे चित्रपट चालत नव्हते मात्र काम तर करावे लागणार होते. मी कामासाठी कॅनडामध्ये गेलो कारण माझा मित्र कॅनडामध्ये होता आणि तो म्हणाला, ‘इथे ये’ मी अर्ज केला आणि मी गेलो. मात्र माझे दोन चित्रपट प्रदर्शित झाले आणि नशिबाने ते सुपरहिट ठरले. तेव्हा माझा मित्र म्हणाला तू परत जा आणि पुन्हा काम सुरु कर. मला आणखी काही चित्रपट मिळाले आणि मला अधिक काम मिळत राहिले.
‘संस्कारी सून’ रुबिना दिसतेय भलतीच बोल्ड
अक्षय कुमारचा ‘सेल्फी’ येत आहे
अक्षय सध्या त्याच्या आगामी चित्रपटाची तयारी करत आहे. राज मेहता दिग्दर्शित ‘सेल्फी’ या चित्रपटात इमरान हश्मी, नुसरत भारुचा आणि डायना पेंटी या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट 24 फेब्रुवारी 2023 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. चित्रपटाला चाहत्यांकडून कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणे आवश्यक आहे.