Download App

Akshaya Kumar च्या बहुप्रतिक्षित चित्रपटाचं पोस्टर रिलीज; प्रेक्षकांची उत्सुकता वाढली

Akshay Kumar आगामी चित्रपटासाठी सज्ज झाला आहे. सरफिरा असं या चित्रपटाचे नाव असून यातून तो पुन्हा एकदा प्रेक्षकांना प्रोत्साहित करणार आहे.

Akshay Kumar much waited Films Poster release : बॉलीवूडच्या प्रसिद्ध आणि सर्वात मोठ्या सुपरस्टार पैकी एक असलेला अभिनेता म्हणजे अक्षय कुमार (Akshay Kumar) तो आता त्याच्या आगामी बहुप्रतिक्षित चित्रपटासाठी (Film) सज्ज झाला आहे. सरफिरा असं या चित्रपटाचे नाव असून या चित्रपटातून तो पुन्हा एकदा प्रेक्षकांना प्रोत्साहित करण्यासाठी येणार आहे. नुकतचं या चित्रपटाचं पहिलं पोस्टर रिलीज (Films Poster release) करण्यात आलं आहे.

‘गजा मारणे गुंड आहे, मला माहित नव्हतं’; ‘त्या’ भेटीवर खासदार लंके स्पष्ट बोलले

हा चित्रपट एक प्रोत्साहन पर चित्रपट आहे ज्यामध्ये स्टार्टअप आणि डायनामिक वर्ल्ड यावरती प्रकाश टाकण्यात आला आहे. तसेच सामान्य व्यक्तीने देखील मोठी स्वप्न आणि आपल्या महत्त्वकांक्षा पूर्ण करण्यासाठी हा चित्रपट प्रेरणा देऊन जातो. 12 जुलैला हा चित्रपट चित्रपटगृहामध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Chandu Champion Review: अभिनेता पडद्यावर चॅम्पियन म्हणून उदयास, वाचा कसा आहे कार्तिकचा चंदू चॅम्पियन सिनेमा?

अक्षय आणि त्याच्या सोशल मीडिया हँडलवर हे पोस्टर शेअर केले आहे. ज्यामध्ये त्याचा रुबाबदार लुक दिसत आहे. तसेच स्वप्न इतकं मोठं पहा की ते तुम्हाला वेड लावेल अशी टॅगलाईन असलेलं हे पोस्टर आहे. चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत असलेल्या अक्षय कुमार सह अभिनेते परेश रावल राधिका मदन आणि सीमा बिस्वास यासारखे कलाकार असणार आहेत.

या चित्रपटाचे दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते सुधा कोंगारा यांनी केलं आहे. तर सुधा आणि शालिनी उषादेवी यांनी चित्रपटाचा लेखन तर पूजा तोलानी यांनी संवाद लेखन केलं आहे. जी.वी. प्रकाश कुमार यांनी या चित्रपटाला संगीत दिले असून चित्रपटाची निर्मिती ही अरुणा भाटिया, दाक्षिणात्य सुपरस्टार सूर्या, ज्योतिका आणि विक्रम मल्होत्रा यांच्याकडून करण्यात आली आहे.

follow us

वेब स्टोरीज