Video : ‘गजा मारणे गुंड आहे, मला माहीत नव्हतं’; ‘त्या’ भेटीवर खासदार लंके स्पष्ट बोलले

Video : ‘गजा मारणे गुंड आहे, मला माहीत नव्हतं’; ‘त्या’ भेटीवर खासदार लंके स्पष्ट बोलले

Nilesh Lanke  Clarification On Gaja Marne Meets : अहमदनगर दक्षिणचे खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी पुण्यातील गुंड गजा मारणे (Gaja Marne) याची भेट घेतल्यानंतर विरोधकांकडून त्यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात आली. या भेटीमुळे होत असलेल्या टीकेवर अखेर निलेश लंके यांनी स्पष्टीकरण दिलंय. गजा मारणे गुंड आहे, मला माहित नव्हतं, ही भेट एक अपघात असून माझा त्या व्यक्तीचा काहीही सबंध नसल्याचं स्पष्टीकरण खासदार निलेश लंके यांनी माध्यमांशी बोलताना दिलंय.

पुढे बोलताना निलेश लंके म्हणाले, ही भेट हा एक अपघात आहे. पुण्यातील पवार नावाच्या सहकाऱ्याचं कॅन्सरने निधन झाल्यामुळे आम्ही त्याच्या कुटुंबाला सांत्वनपर भेट देण्यासाठी गेलो होते. त्यानंतर राष्ट्रवादीचा पदाधिकारी प्रविण धनवे यांच्या घरी आम्ही गेलो. त्याचवेळी तिथून जात असतानाच काही लोकांनी मला हात केला. समाजकार्यात काम करणाऱ्याला थांबावं लागतं.

सहा महिन्यांपासून ‘प्लॅनिंग’ : प्रॉपर्टीसाठी सुनेनं काढला सासऱ्याचा काटा; पॉलिटिकल कनेक्शनचाही संशय

मला त्यांनी चहाला आग्रह धरला, त्यानंतर माझा सत्कार केला. तोपर्यंत मला त्याच्याबद्दलची कुठलीही पार्श्वभूमी माहित नव्हती, त्यानंतर मला पुण्यातून काही लोकांचे फोन आले. तेव्हा मला पार्श्वभूमी माहित झाली. हा प्रकार म्हणजे एक अपघात असून त्या व्यक्तीचा आणि माझा काहीही संबंध नाही ही एक नकळत चूक असल्याचं निलेश लंके यांनी स्पष्ट केलंय.

ENG vs Oman : फक्त 19 चेंडूत सामना जिंकला; इंग्लंडचा ओमानवर मोठ्ठा विजय

यावेळी बोलताना निलेश लंके यांनी अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी खोचक टोला लगावलायं. गजा मारणे-लंके भेटीवरुन मिटकरींनी त्यांच्यावर सडकून टीका केली होती. निलेश लंके आभार मानण्यासाठी गेले, असल्याची टीका मिटकरींनी केली. त्यावर बोलताना लंके म्हणाले, तुला काही माहिती आहे का? परिस्थितीची जाणीव करुन घे…तुला एखाद्या पक्षाने मीडियासमोर बोलायला ठेवलं म्हणून काहीही बोलायंच का? असा खोचक टोला लंके यांनी लगावलायं.

खासदार लंके यांनी कुख्यात गुंड गजा मारणे याची त्याच्या घरी जाऊन भेट घेतली. दरम्यान, गजा मारणेने लंके यांचा यावेळी सत्कार केला. या संदर्भातील व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला. मारणे हा कुख्यात गुंड असून त्याला पप्पू गावडे आणि अमोल बधे खून प्रकरणामध्ये अटक झाली होती.

गजानन मारणे याचं मुळ गाव मुळशी तालुक्यातील असून गजा मारणे हा मारणे टोळीचा म्होरक्या आहे. त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहे. पप्पू गावडे आणि अमोल बधे खून प्रकरणामध्ये गजा मारणे याला अटक झाली होती. या खून प्रकरणात न्यायालयाने त्याला शिक्षाही दिली होती. त्यानंतर गजा मारणे तीन वर्ष पुण्यातील येरवडा कारगृहात होता.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज