पंतप्रधान नरेंद्र मोदी इटलीत दाखल; G7 शिखर परिषदेत होणार सहभागी, जागतिक मुद्दांवर चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी इटलीत दाखल; G7 शिखर परिषदेत होणार सहभागी, जागतिक मुद्दांवर चर्चा

G7-Summit 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी G7 शिखर परिषदेसाठी इटलीमध्ये पोहचले आहेत. (Georgia Meloni) तेथे त्यांचं इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी स्वागत केलं. दरम्यान, पंप्रधान मोदी येथे होणाऱ्या जागतिक नेत्यांसोबत अनेक द्विपक्षीय बैठकी सहभागी होणार आहेत. (G7-Summit) यामध्ये रशिया युक्रेन युद्धावर चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

यांचाही समावेश    G7 Summit : आधी पत्र लिहले आता थेट भेट; रशिया- युक्रेन युद्धानंतर मोदी अन् झेलेन्स्की आमनेसामने

या बैठकीला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन, फ्रेंचचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन, जपानचे पंतप्रधान फुमीओ किशिदा आणि कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्यासह इतर महत्त्वाचे नेतेही उपस्थित आहेत. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या दौऱ्यावेळी त्यांच्यासोबत एक उच्चस्तरिय समिती आहे. त्यामध्ये नवनियुक्त परराष्ट्रमंत्री एस जयशंकर, परराष्ट्र सचिव विनय क्वात्रआ आणि एनएसए अजित डोवाल यांचा समावेश आहे.

सदस्यत्व रद्द करण्यात आलं  

इटली हा यंदाच्या बैठकीचा यजमान देश आहे. यंदाच्या G7 देशांच्या समितीतल अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, इटली,जर्मनी, कॅनडा आणि जपान या विकसित देशांचा समावेश आहे. G7 देशांच्य बैठकीत जगभरातील प्रमुख मुद्द्यांवर चर्चा केली जाते. हा गट आधी G8 असा होता. पण 2014 साली रशियाने क्रिमियावर हल्ला केल्यानंतर त्या देशाचं सदस्यत्व रद्द करण्यात आलं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube