Italy PM Giorgia Meloni Breakup : ‘या’ कारणामुळे जी 20 परिषदेत चर्चेत आलेल्या इटलीच्या पंतप्रधान मेलोनींचा घटस्फोट

Italy PM Giorgia Meloni Breakup : ‘या’ कारणामुळे जी 20 परिषदेत चर्चेत आलेल्या इटलीच्या पंतप्रधान मेलोनींचा घटस्फोट

Italy PM Georgia Melony Breakup : जी 20 परिषदेमध्ये इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी (Italy PM Giorgia Meloni Breakup) या चांगल्याच चर्चेत आल्या होत्या त्यांनी केलेलं भाषण असो किंवा पंतप्रधान मोदींची त्यांनी केलेला हस्तांदोलनाचा मात्र आता याच मेलोनिनचा घटस्फोट झाला आहे.

ठाकरे, पवार अन् पटोलेंना सकाळपर्यंत वेळ; ‘नाक घासून’ राज्याची माफी मागावी! बावनकुळे आक्रमक

त्यांनी त्यांचे पार्टनर एंड्रिया जियाम्ब्रुनो यांच्यापासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यांनी त्यांच्या निर्णयाबद्दल फेसबुक या सोशल मीडिया माध्यमातून पोस्ट करत माहिती दिली. तर जॉर्जिया यांचे पार्टनर एंड्रिया जियाम्ब्रुनो हे एक पत्रकार आहेत. त्यांच्या एका महिलांबाबतच्या वक्तव्यामुळे पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी त्यांच्याशी घटस्फोट घेतल्याचं सांगण्यात आलं आहे.

काय म्हणाल्या जॉर्जिया?

पंतप्रधान जॉर्जिया यांनी आपल्या घटस्फोटाबाबतच्या फेसबुकवरील पोस्टमध्ये लिहिल आहे की, एंड्रिया जियाम्ब्रुनो यांच्यासोबतच माझं नातं संपत आहे. आमचं नातं दहा वर्षे चाललं. जो वेळ आम्ही सोबत घालवला त्यासाठी मी त्यांचे आभार मानते. त्याचबरोबर त्यांनी मला एक मुलगी दिली त्यासाठीही त्यांच्या आभार मानते. गेल्या काही दिवसांपासून आम्ही आमचे मार्ग बदलले होते. आता ते स्वीकारण्याची वेळ आली आहे. तसेच जे सर्वजण मला कमजोर समजत होते. त्यांना आता कोणतेही यश येणार नाही.

Aus VS Pak : कांगारूंनीही पाकला धुतलं; 62 धावांनी विजय मिळवत ऑस्ट्रेलियाची चौथ्या स्थानी झेप

काय होतं एंड्रिया जियाम्ब्रुनो यांचं महिलांबाबतचे वक्तव्य?

पंतप्रधान जॉर्जिया यांनी सांगितल्यानुसार त्यांच्या घटस्फोटाचे कारण हे एंड्रिया जियाम्ब्रुनो यांनी केलेल्या महिलांबाबतच्या वक्तव्यामुळे आहे. तर एंड्रिया जियाम्ब्रुनो यांनी टीव्हीवरील एका कार्यक्रमात महिलांबाबत आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. जो व्हिडिओ चांगला व्हायरल झाला होता. तसेच गेल्या काही दिवसांपूर्वी ते एका कार्यक्रमात आपल्या महिला सहकार्यासोबत अश्लील वर्तन करताना, अश्लील बोलताना देखील दिसले होते. त्याचबरोबर या अगोदर देखील ते महिला अत्याचारांच्या बाबतीत त्यांच्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आले होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube