Download App

‘BMCM’ चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, चार दिवसातच कमावले इतके कोटी

Bade Miyan Chote Miyan Box Office Collection Day 4: चाहते अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि टायगर श्रॉफचा (Tiger Shroff) ॲक्शन चित्रपट ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ च्या (Bade Miyan Chote Miyan) रिलीजची आतुरतेने वाट पाहत होते. ईदच्या मुहूर्तावर हा चित्रपट थिएटरमध्ये दाखल झाला होता. ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ला अजय देवगणच्या (Ajay Devgan) मैदानाशीही टक्कर द्यावी लागली, तरीही अक्षयच्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार ओपनिंग केली होती. यानंतर दुस-या दिवशी चित्रपटाच्या कमाईत 50 टक्क्यांची घसरण झाली असली तरी या चित्रपटाला वीकेंडचा पाठिंबा मिळाला आणि चौथ्या दिवशी ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ने किती कोटींची कमाई केली चला तर मग जाणून घेऊया…


‘बडे मियाँ छोटे मियाँ’ने रिलीजच्या चौथ्या दिवशी किती कमाई केली?

अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफच्या ‘बडे मियाँ छोटे मियाँ’च्या अप्रतिम ॲक्शनने प्रेक्षकांना थक्क केले आहे. हा ॲक्शन थ्रिलर पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रेक्षक थिएटरमध्ये पोहोचत आहेत. मात्र, हा चित्रपट अपेक्षेप्रमाणे व्यवसाय करत नाहीये. 300 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने चार दिवसांत 96.18 कोटींचा आकडा गाठलेला आहे.

‘बडे मियाँ छोटे मियाँ’च्या कमाईबद्दल बोलायचे झाले तर, या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी 15.65 कोटींची कमाई केली होती. रिलीजच्या दुसऱ्या दिवशी ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ची कमाई 51.44 टक्क्यांनी घसरली आणि 7.6 कोटी रुपये कमावले. मात्र, तिसऱ्या दिवशी शनिवारी ‘बडे मियाँ छोटे मियाँ’च्या कलेक्शनमध्ये 11.84 टक्क्यांनी वाढ झाली असून 8.5 कोटींची कमाई झाली आहे. आता चित्रपटाच्या कमाईचे आकडे रिलीजच्या चौथ्या दिवशी म्हणजेच रविवारी आले आहेत. SACNL च्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ ने रिलीजच्या चौथ्या दिवशी म्हणजेच रविवारी 9.00 कोटी रुपयांची कमाई केली आहे. यासह ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ने रिलीजच्या चार दिवसांत 96.18 कोटींची कमाई केली आहे.

‘बडे मियाँ छोटे मियाँ’ने करिनाच्या टीमचा रेकॉर्ड मोडला

‘बडे मियाँ छोटे मियाँ’ने देशांतर्गत बाजारात चार दिवसांत 40 कोटींहून अधिक कमाई केली आहे. यासह या चित्रपटाने करीना कपूरच्या क्रू’च्या चार दिवसांच्या कमाईचा विक्रम मोडला आहे. रिलीजच्या चार दिवसांत क्रूने 33.7 कोटी रुपये कमावले होते.

‘बडे मियाँ छोटे मियाँ’ ने जगभरात किती कमाई केली?

‘बडे मियाँ छोटे मियाँ’ जगभरात धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाला जगभरातील प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत असून यासोबतच हा चित्रपट उत्तम कलेक्शनही करत आहे. प्रॉडक्शन हाऊस पूजा एंटरटेनमेंटने ‘बडे मियाँ छोटे मियाँ’चे जगभरातील कमाईचे आकडे शेअर केले आहेत. त्यानुसार या चित्रपटाने रिलीजच्या तीन दिवसांत जगभरात 76.01 कोटी रुपयांची कमाई केली आहे. रविवारी चौथ्या दिवशी हा चित्रपट 96.18 कोटींचा आकडा पार केला आहे. आता हा चित्रपट जगभरात 100 कोटींचा आकडा पार करण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे.

IP अ‍ॅड्रेस कॅनडाचा तर, कट अमेरिकेत; सलमानवरील हल्ल्याचा असा होता ‘मास्टर प्लॅन’

‘बडे मियाँ छोटे मियाँ’ स्टारकास्ट

अली अब्बास जफर दिग्दर्शित ‘बडे मियाँ छोटे मियाँ’मध्ये अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटात सोनाक्षी सिन्हा, मानुषी छिल्लर आणि अलाया एफ यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या चित्रपटात पृथ्वीराज सुकुमारन यांनी खलनायकाची भूमिका साकारली आहे. ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ ची निर्मिती वाशू भगनानी, दीपशिखा देशमुख, जॅकी भगनानी, हिमांशू किशन मेहरा आणि अली अब्बास जफर यांनी केली आहे. मुंबई, लंडन, अबू धाबी, स्कॉटलंड आणि जॉर्डन यांसारख्या ठिकाणी याचे शूटिंग झाले आहे.

follow us