Khurchi Teaser Release Out: मराठी मनोरंजन विश्वात सध्या अनेक वेगवेगळ्या विषयांच्या सिनेमांची निर्मिती होत असताना दिसत आहे. (Akshay Waghmare) यामध्ये खासकरुन राजकारणावर आधारित सिनेमांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळत आहे. (Khurchi Teaser Out) यामध्ये ‘धुरळा’, ‘झेंडा’, ‘वजीर’, ‘देऊळ’ असे सिनेमा राजकारणावर आधारित आहेत. यामध्ये आता खुर्ची (Khurchi) हा आगामी सिनेमा चाहत्यांच्या भेटीसाठी सज्ज झाला आहे. नुकतचं या सिनेमाचा धमाकेदार टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे.
अभिनेता राकेश बापट, अक्षय वाघमारे यांची प्रमुख अभिनय असलेल्या मराठी सिनेमाचा धमाकेदार टीझर प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटातच सोशल मीडियावर या धमाकेदार टीझरचा ट्रेंड होत असल्याचं बघायला मिळत आहे. अंगावर शहारे आणणारा असा हा धमाकेदार टीझर असून या मराठी सिनेमात अॅक्शन सीन असल्याचं दिसत आहे. या सिनेमाच्या टीझरच्या सुरुवातीलाच तुरुंगामध्ये असलेल्या एका लहान मुलापासून होते.
‘जिथे माझ्या कथेचा शेवट झाला तिथूनच एका अनोख्या कथेला सुरुवात करण्यासाठी मी राजवीर देसाई पुन्हा आलो आहे, सत्तेसाठी, खुर्चीसाठी आणि माझ्या अंगात सळसळणाऱ्या रक्तासाठी”, अशा हटक्या डायलॉगने या धमाकेदार टीझरची सुरुवात करण्यात आली आहे. आणि, त्यानंतर एका मागोमाग एक जबरदस्त सीन होताना दिसत आहे. सत्तेसाठी सुरु झालेलं हे वादळ आणखीच वाढत असल्याचे दिसत आहे. घातपात, रक्तपात असं बरंच काही या टीझरमध्ये बघायला मिळत आहे.
“नुकताच या मराठी सिनेमाचा धमाकेदार टीझर रिलीज झाला आहे. टीझर बघून तुम्हाला कल्पना आली असेल की नक्की आम्ही काय आणि कशा प्रकारचा राडा घातला आहे. एकूणच हा सिनेमा करत असताना खूप मज्जा आली,” असं राकेश बापट यावेळी सांगितले आहे. ‘खुर्ची’ या बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित चित्रपटात अभिनेता अक्षय वाघमारे, एस. आर्यन, राकेश बापट,अभिनेत्री प्रीतम कागणे, अभिनेत्री श्रेया पासलकर यांच्यासह सुरेश विश्वकर्मा, महेश घाग, कल्याणी नंदकिशोर हे कलाकार महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत.
Shilpa Shetty चा पती राज कुंद्राला मोठा दिलासा; पोर्नोग्राफीमध्ये ईडीला आढळला नाही थेट संबंध
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले आणि अभिनेत्री आराधना शर्मा यांच्या विशेष भूमिका या चित्रपटात दिसणार आहेत. चित्रपटाची गाणी प्रशांत मडपुवर, सौरभ आणि सोमनाथ शिंदे यांनी लिहिली असून, त्यांना सन्मित वाघमारे, अभिषेक काटे यांनी संगीत दिले आहे. तर आदर्श शिंदे, अवधूत गुप्ते, अभय जोधपुरकर, रसिका वाखरकर, अमिता घुगरी आणि आर्यन यांनी आपल्या सुमुधुर आवाजाने या चित्रपटासाठी गायन केले आहे. आता नव्या वर्षाच्या स्वागताला आणि सत्तेच्या ‘खुर्ची’चा धुराळा पाहण्यासाठी 12 जानेवारी 2024 दिवशी नक्कीच सज्ज राहणार आहे.