ओळखलंत का या अभिनेत्याला? सिनेमासाठी वाढवलं चक्क ‘इतके’ किलो वजन

ओळखलंत का या अभिनेत्याला? सिनेमासाठी वाढवलं चक्क ‘इतके’ किलो वजन

Akshay Waghmare : अंडरवर्ल्ड डॉन, डॅडी अरुण गवळी (Arun Gawli) यांचा जावई अक्षय वाघमारे (Akshay Waghmare) मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. कलाकार म्हटलं की, त्यांचा व्यायाम हा सर्वप्रथम आला. असं असलं तरी अनेकवेळा हे कलाकार वजनावरून ट्रोल होत असल्याचे दिसत असतात. (Khurchi Marathi Movie) नेहमीच प्रत्येक कलाकार फिटनेस (Fitness) राहण्यासाठी धडपड करत असल्याचे बघायला मिळत असते. भूमिकेला साजेसं दिसण्यासाठी ही कलाकार मंडळी अतिशय मेहनत घेत असल्याचे पाहायला मिळत असतात. ही घेतलेली मेहनत आपण रुपेरी पडद्यावर कायमच बघायला मिळत असते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Planet Marathi प्लॅनेट मराठी (@planet.marathi)


अशातचअंडरवर्ल्ड डॉन, डॅडी अरुण गवळी यांचा जावई अक्षय वाघमारे याने वजन वाढवलं असल्याची माहिती समोर आली आहे. वजन कमी करण्याबद्दल अनेकवेळा आपण ऐकतो, परंतु वजन वाढवण्याबाबत चुकून ऐकायला मिळतं असते. मराठमोळा अभिनेता अक्षय वाघमारे याने त्याच्या आगामी ‘खुर्ची’ (Khurchi Movie) या सिनेमातील त्याच्या भूमिकेसाठी तब्बल 5 किलो वजन वाढवलं असल्याची माहिती समोर आली आहे. एवढेच नव्हे तर रावडी अशा भूमिकेला साजेसं असं मसल गेन ही त्याने केल्याचे बघायला मिळत आहे. अक्षयने घेतलेली ही मेहनत समोर आलेल्या फोटोंवरून बघणं खूपच रंजक ठरत आहे. 5 किलो वजन वाढवून आणि मसलवर जास्ती जास्त भर देऊन अक्षयने पुन्हा एकदा चाहत्यांमध्ये एक अनोखी छाप पाडली आहे.

‘खुर्ची’ या सिनेमात अक्षयची रावडी भूमिका बघायला मिळणार आहे. हा सिनेमा संतोष कुसुम हगवणे प्रस्तुत ‘आराध्या मोशन फिल्म्स’, व ‘योग आशा फिल्म्स’ निर्मित या सिनेमाच्या निर्मितीची धुरा संतोष कुसुम हगवणे, योगिता गवळी आणि प्रदीप नत्थीसिंग नागर यांनी एकत्र सांभाळली आहे. या मराठी सिनेमाची कथा, पटकथा, संवाद निर्माते संतोष कुसुम हगवणे यांचे असून दिग्दर्शक शिव धर्मराज माने आणि संतोष कुसुम हगवणे यांनी सिनेमाच्या दिग्दर्शनाची बाजू उत्तमरीत्या केली आहे.

Salman Khan Threat: सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी, पोलिसांकडून सुरक्षेत वाढ

अक्षयच्या या आगामी सिनेमातील मुख्य भूमिकेसाठी अक्षयने खूपच मेहनत घेतली आहे. या सिनेमाबद्दल बोलत असताना अक्षय म्हणाला की, “एखाद्या भूमिकेसाठी विशेष मेहनत घेणं हे अर्थात आव्हानात्मक असतं. माझ्या आगामी ‘खुर्ची’ या सिनेमातील माझ्या भूमिकेसाठी मी तब्बल ५ किलो वजन वाढवलं आहे, आणि मसल गेन करण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे.

विशेष म्हणजे हे माझ्याकडून करून घेण्यात आले आहे, सोबतच या गोष्टींसाठी मदत केलेल्या सर्वांचा मी खूप आभारी आहे. कारण माझी भूमिका अंत्यत तंतोतंत मांडण्यासाठी सर्वानी खूप मेहनत घेतली आहे. तुम्ही आजवर खूप प्रेम माझ्यावर केलं आहात, नक्कीच तुम्ही माझ्या खुर्ची सिनेमातील भूमिकेवर खूप प्रेम कराल, अशी आशा करतो” असं यावेळी अक्षयने सांगितले आहे. अक्षयची ही दमदार भूमिका येत्या 12 जानेवारी 2024 रोजी रुपेरी पडद्यावर बघणं खूपच उत्सुकतेचं ठरणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube