Albatya Galbatya Teaser : “अलबत्या गलबत्या” (Albatya Galbatya) हे गाजलेलं बालनाट्य आता प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच थ्रीडीमध्ये (3D) येणार आहे. लेखक दिग्दर्शक वरूण नार्वेकर (Varun Narvekar) यांनी या नाटकावरून चित्रपट करण्याची घोषणा केली आहे. या चित्रपटामध्ये अभिनेते वैभव मांगले (Vaibhav Mangle) भूमिका साकारणार आहेत.
1 मे 2025ला हा चित्रपट रिलीज होणार असून सोशल मीडियावर या चित्रपटाचं टीझर पोस्टर लाँच करण्यात आला असून प्रक्षकांकडून याला जबरदस्त रिस्पॉन्स मिळत आहे.
एव्हरेस्ट एंटरटेन्मेंटचे संजय छाब्रिया, उदाहरणार्थ निर्मितचे सुधीर कोलते आणि न्यूक्लिअर अॅरोचे ओंकार सुषमा माने या चित्रपटाची निर्मिती करत असून भालजी पेंढारकर चित्र हे सहयोगी निर्माते आहेत. तर कथा, कादंबरी, नाटकसह विविध साहित्यप्रकार रत्नाकर मतकरी यांनी हाताळले आहे. रत्नाकर मतकरी यांचे अनेक नाटकं, मराठी प्रायोगिक, व्यावसायिक रंगभूमीवर गाजली आहे. मतकरी यांनी बालरंगभूमीवरही अनेक यशस्वी प्रयोग केले आहे.
“अलबत्या गलबत्या” या चित्रपटाला दिग्दर्शक करण्याची संधी निर्मात्यांनी तरुण लेखक दिग्दर्शक वरूण नार्वेकर यांना दिली आहे. नार्वेकर यांनी आतापर्यंत चित्रपट, वेब सीरिज केल्या आहेत. त्यात मुरांबा, दो गुब्बारे, एक दोन तीन चार यांचा समावेश आहे. तसेच त्यानं दिग्दर्शित केलेल्या अनेक जाहिरातीही गाजल्या आहेत. “अलबत्या गलबत्या” अत्याधुनिक व्हीएफेक्ससह थ्रीडी मध्ये रिलीज होत असल्याने हा चित्रपट अनेकांना आकर्षित करू शकते.
“अलबत्या गलबत्या” टीझर पोस्टर