आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित पहिला मराठी चित्रपट, पुष्कर जोग साकारणार भूमिका

आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित पहिला मराठी चित्रपट, पुष्कर जोग साकारणार भूमिका

Dharma The AI Story: एका वेगळ्या विषयावर भाष्य करणारा ‘धर्मा- दि एआय स्टोरी’ लवकरच चित्रपटगृहात प्रदर्शित होईल. (Marathi Movie) आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित हा पहिलाच मराठी चित्रपट असणार असून नुकतीच या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. बियु प्रॉडक्शन निर्मित ‘धर्मा- दि एआय स्टोरी’चे (Dharma The AI Story) पुष्कर सुरेखा जोग दिग्दर्शक आहेत. पुष्कर जोग (Pushkar Jog) यांनी मराठी सिनेसृष्टीला कायम हटके विषय देताना दिसत असतो. त्यांचा प्रत्येक चित्रपट हा नाविन्यपूर्ण असतो, त्यामुळे या चित्रपटाच्या माध्यमातूनही प्रेक्षकांना नक्कीच काहीतरी भन्नाट पाहायला मिळणार आहे.

या चित्रपटाच्या तेजल पिंपळे निर्मात्या आहेत. तर पुष्कर सुरेखा जोग, दीप्ती लेले आणि स्मिता गोंदकर यात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. आतापर्यंत आपण एआय टेक्नॉलॉजी आपण फक्त सोशल मीडिया आणि इतर अनेक वेगवेगळ्या गेमिंग प्लॅटफॉर्मवर बघितली होती. आता हाच विषय थेट आपल्याला मराठी सिनेमात पाहायला मिळणार असल्याने ‘धर्मा- दि एआय स्टोरी’ विषयीची मोठी उत्सुकता लागलेली दिसत आहे.

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक पुष्कर जोग सांगितलं आहे की,” मराठी मनोरंजन विश्वात हा प्रयोग पहिल्यादांच होत आहे. या चित्रपटाचा विषय नवीन असून यामध्ये तुम्हाला अनेक नवीन गोष्टी दिसतील. हा विषय एआयवर आधारित आहे. कसा एआय टेक्नॉलॉजीचा वापर करून वैयक्तिक सूड उगवण्याचा प्रयत्न करत एका निष्ठावंत बापाच्या मुलीचे अपहरण केले जाते.

‘BMCM’ चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, चार दिवसातच कमावले इतके कोटी

आपल्या मुलीला पुन्हा जिवंत पाहाण्यासाठी धर्म मुक्तीच्या धोकादायक प्रवासाला निघालेल्या या बापाची कहाणी यात पाहायला मिळणार आहे. चित्रपटाच्या चित्रीकरणाची सुरुवात सुरू झाली असून सप्टेंबर महिन्यात ही फिल्म प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube