Download App

Alia Bhatt: हत्तीच्या मृत्यूचे गूढ उलघडणार का? ‘पोचार’ वेबसिरिजचा जबरदस्त ट्रेलर रिलीज

Poacher Trailer Release: ‘पोचार’ (Poacher web series) ही अमेझॉन प्राइम (Amazon Prime) व्हिडिओची मूळ गुन्हेगारी वेब सिरीज (web series) आहे. त्याचा धमाकेदार ट्रेलर रिलीज झाला आहे. (Social Media) ट्रेलरही देखील खूपच दमदार दिसत आहे. हत्तीच्या हत्येभोवती फिरणाऱ्या या वेब सिरीजची पहिली झलक सध्या सोशल मीडियावर (social media) प्रदर्शित करण्यात आली आहे. अशोक असे त्या हत्तीचे नाव आहे.

‘पोचार’ची निर्मिती आलिया भट्टने (Alia Bhatt) केली आहे. त्याचबरोबर या वेब सिरीजचे दिग्दर्शक रिची मेहता हे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ही वेब सिरीज एका सत्य घटनेवर आधारित आहे. त्याची कथा एका हत्तीभोवती फिरत आहे. हा शो हस्तिदंत शिकारीवर आधारित आहे. ही वेब सिरीज 23 फेब्रुवारीला अमेझॉन प्राइमवर येणार आहे. तसेच ही वेब सिरीज हिंदीसह इंग्रजी, तमिळ, तेलगू आणि कन्नड भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. तसेच ही वेब सिरीज 240 देशांमध्ये एकाच वेळी रिलीज होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

‘पोचार’च्या ट्रेलरमध्ये हत्तींच्या सततच्या हत्यांची झलक पाहायला मिळते. हा ट्रेलर खूपच भयानक आहे. या अवैध शिकारीत पोलिसांसह अनेकजण या टोळीत सामील असल्याचे दिसत आहेत. या टोळीचा तपास सुरू असून, त्यातून ही बाब समोर आली आहे. या टोळीचा पर्दाफाश होणार का? या आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश येणार का? या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी या वेब सिरीजची वाट पाहावी लागणार आहे. या वेब सिरीजची कार्यकारी निर्माती आलिया भट्ट असणार आहे.

सिद्धार्थ मल्होत्राची आकाशात भरारी! आगामी ‘योधा’ सिनेमाचं धमाकेदार पोस्टर रिलीज

गेल्या काही दिवसांपूर्वी आलिया भट्टने इन्स्टाग्रामवर ‘पोचार’शी संबंधित एक व्हिडिओ शेअर केला होता. या क्लिपमध्ये आलिया काही पोलिसांसोबत जंगलात दिसत आहे. व्हिडीओमध्ये आलिया म्हणते की, सकाळी 9 वाजता अशोकच्या हत्येची बातमी आली. यासोबतच ती सांगते की, या महिन्यातील हा तिसरा अपघात असून अशोक अवघ्या 10 वर्षांचा होता. अभिनेत्री पुढे म्हणते की अशोक आपल्यापैकी नाही, याचा अर्थ असा नाही की त्याच्यावर झालेला गुन्हा छोटा समजावा. असे या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये बोलत असल्याचे पाहायला मिळाले आहे.

follow us

वेब स्टोरीज