Download App

Alia Bhattने पापराझीची रस्त्यावर पडलेली चप्पल उचलल्याने चाहत्यांनी केले कौतुक, व्हिडीओ व्हायरल

Alia Bhat Video Viral: बॉलिवूडची (Bollywood) क्यूट गर्ल म्हणून कायम ओळखली जाणारी अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) ही सतत चर्चेत येत असते. कधी तिच्या सिनेमामुळे (cinema) तर कधी तिच्या खासगी आयुष्यामुळे. (Video Viral) ती गुरुवारी संध्याकाळी आलिया, आणि तिची आई सोनी राजदन व बहिण शाहिन भट्ट बरोबर डिनर डेटला गेल्याचे दिसून येत आहे.


मुंबईतील वांद्रे येथील हॉटेलमध्ये ती जेवायला गेल्याचे यावेळी बघायला मिळाले आहे. त्याठिकाणी काही फोटोग्राफर्स  (Photographers) उपस्थित होते. परंतु त्यावेळेस आलियाने असे काही केले की चाहत्यांनी तिचे कौतुक करण्यास सुरुवात केल्याचे दिसत आहे. आलिया फोटोसाठी पोझ देत असताना तिला तेथे कोणाची तरी चप्पल दिसून आली. ती चप्पल दिसताच तिने ती हाताने उचलत कोणाची आहे असा सवाल केला. नंतर तिला ती फोटोग्राफरची असल्याचे समजले.

आलियाने ती चप्पल हाताने उचलून त्या फोटोग्राफरला परत दिली. आलियाचे हे वागणे पाहून चाहत्यांनी तिचे कौतुक करण्यास सुरुवात केले आहे. आलियाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घालत आहे. अनेकजण या व्हिडीओवर कमेंट करत असल्याचे दिसून येत आहे. एका यूजरने ‘तू क्वीन आहेस’ असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने ‘हा व्हिडीओ खूप मस्त आहे’ असे म्हटले आहे. तसेच तिसऱ्या एका यूजरने ‘ती खूपच डाउन टू अर्थ आहे’ अशा जोरदार कॉमेंट्स या व्हिडिओला करत आहेत.

आपल्याच मुलीला रीना दत्ता म्हणाली, ‘…तर तू जिवंत राहायची नाहीस’; आमिरच्या मुलीवर ही वेळ का आली?

आलियाच्या कामाबद्दल सांगायचं झाले तर तिचा ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा सुपरहिट सिनेमा चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात आलिया भट्ट आणि रणवीर सिंहसोबत अनेक उत्तम कलाकारांची टीम दिसून येणार आहे. या सिनेमात धर्मेंद्र, जया बच्चन आणि शबाना आझमी यांच्या महत्त्वाच्या भूमिका दिसून येणार आहेत. ‘रॉकी और रानी की प्रेम कहाणी’ या सिनेमातून करण जोहर तब्बल ७ वर्षांनी दिग्दर्शनाच्या क्षेत्रात परतला आहे. ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा सिनेमा २८ जुलै दिवशी सिनेमागृहात प्रदर्शित करण्यात येणार आहे.

Tags

follow us