दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळाची वर्षपूर्ती; ‘छबिला’च्या विशेष प्रदर्शनाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!
महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या ‘दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळा’ने वर्षपूर्तीचा टप्पा गाठला आहे.
Dadasaheb Phalke Film Appreciation Club: मुंबई, 4 ऑक्टोबर : मराठी चित्रपटसृष्टीतील दर्जेदार कलाकृतींचा वारसा जपत चित्रपट रसिकांमध्ये अभिरुची निर्माण करणे, आशयपूर्ण चित्रपटांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि सुजाण चित्रपट प्रेक्षकांची नवी पिढी घडविण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या ‘दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळा’ने वर्षपूर्तीचा टप्पा गाठला आहे. वर्षपूर्तीनिमित्त 62 व्या महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मान पटकावलेल्या ‘छबिला’ या चित्रपटाचे विशेष प्रदर्शन आयोजित करण्यात आले. या प्रदर्शनाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
‘निवडणूक आयोगामुळेच एवढा माज आलाय’; राज ठाकरेंनी गर्जना मोर्चात भाजपचा ‘माज’च काढला!
सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या या उपक्रमाच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीतील दर्जेदार कलाकृती रसिकांपर्यंत पोहोचविण्यासोबतच चित्रपटाचा कलात्मक आणि तांत्रिक दृष्टिकोनातून आस्वाद घेणारा प्रेक्षकवर्ग घडविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनातून तसेच महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्या पुढाकारातून या उपक्रमाला वर्षभर सातत्यपूर्ण स्वरूप देण्यात आले.
वर्षपूर्तीनिमित्त आयोजित ‘छबिला’च्या विशेष प्रदर्शनाने या उपक्रमाच्या यशस्वी वर्षभराच्या प्रवासाची सांगता झाली. आगामी काळातही अधिकाधिक दर्जेदार चित्रपट, चित्रपटसृष्टीतील मान्यवरांशी संवाद आणि विविध उपक्रमांच्या माध्यमातून चित्रपट रसिकांची अभिरुची अधिक समृद्ध करण्याचा तसेच मराठी चित्रपटांना व्यापक प्रेक्षकवर्ग मिळवून देण्याचा मंडळाचा प्रयत्न राहणार आहे. यावेळी महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर, वित्तीय सल्लागार तथा मुख्य लेखा व वित्त अधिकारी चित्रलेखा खातू-रावराणे यांच्यासह अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
मतदानाचा हक्क हिरावलात तर… उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना थेट इशारा; गर्जना मोर्चात जोरदार हल्लाबोल
मराठी चित्रपटसृष्टीतील दर्जेदार आणि आशयपूर्ण चित्रपट रसिकांपर्यंत पोहोचावेत, जुन्या व नव्या चित्रपटांचा कलात्मक दृष्टिकोनातून आस्वाद घेणारा प्रेक्षकवर्ग तयार व्हावा, तसेच चित्रपट क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञ आणि दिग्दर्शकांच्या कलाकृतींना व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने या मंडळाची सुरुवात करण्यात आली. वर्षभरात विविध धाटणीच्या आणि आशयपूर्ण चित्रपटांचे विशेष प्रदर्शन आयोजित करून या उपक्रमाने रसिकांना चित्रपटांकडे पाहण्याची नवी दृष्टी देण्याचा प्रयत्न केला.
या उपक्रमांतर्गत वर्षभरात ‘संत तुकाराम’, ‘जीव’, ‘अवघाचि संसार’, ‘जिप्सी’, ‘हमाल दे धमाल’, ‘पप्पा सांगा कुणाचे…’, ‘गोंधळ’ तसेच भारतरत्न सत्यजित रे दिग्दर्शित ‘पाथेर पांचाली’ यांसारख्या विविध धाटणीच्या चित्रपटांचे विशेष प्रदर्शन करण्यात आले. जुन्या गाजलेल्या चित्रपटांपासून समकालीन आशयपूर्ण कलाकृती आणि भारतीय चित्रपटसृष्टीतील अभिजात चित्रपटांपर्यंत विविध प्रकारच्या सिनेमांचा आस्वाद घेण्याची संधी या माध्यमातून रसिकांना मिळाली.
Garjana Morcha : ‘जो डाले वोट पे डाका, उसका नाम ज्ञानू काका’, अनिल देशमुखांची डायलॉगबाजी
या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ चित्रपट प्रदर्शनापुरते त्याचे स्वरूप मर्यादित न ठेवता चित्रपटाच्या टीमसोबत संवाद, गप्पा आणि चित्रपटनिर्मितीच्या प्रवासाची प्रत्यक्ष ओळख करून देण्यात आली. त्यामुळे चित्रपटाच्या आशयाबरोबरच दिग्दर्शन, अभिनय, संगीत, छायांकन आणि तांत्रिक बाजू समजून घेण्याची संधी रसिकांना मिळाली. या संवादातून प्रेक्षक आणि चित्रपटसृष्टी यांच्यातील नाते अधिक दृढ झाले असून, ‘दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळ’ हे केवळ चित्रपट प्रदर्शनाचे व्यासपीठ न राहता चित्रपट संस्कृतीच्या समृद्धीसाठीचे व्यासपीठ म्हणून विकसित होत आहे.
चित्रपट रसिकांना या उपक्रमाशी अधिक जवळून जोडण्यासाठी मंडळाचे सदस्यत्वही उपलब्ध करून देण्यात आले आहे. सदस्यत्वासाठी ₹५०० नोंदणी शुल्क आकारण्यात येते आणि हे सदस्यत्व तीन वर्षांसाठी (त्रैवार्षिक) वैध असते. त्यामुळे सदस्यांना मंडळाच्या विविध उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासोबतच दर्जेदार चित्रपटांचा आस्वाद घेण्याची संधी सातत्याने उपलब्ध होत आहे.
‘ज्ञानेश कुमारच नाही, मोदी-शाहांनाही घरी जावं लागेल’, संजय राऊतांचा मोठा दावा
महामंडळाचा हा उपक्रम केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित न राहता देशाच्या राजधानी दिल्लीपर्यंत पोहोचला आहे. दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळाच्या उपक्रमाची दुसरी आवृत्ती दिल्ली येथे सुरू करण्यात आली असून, महाराष्ट्राची समृद्ध चित्रपट परंपरा आणि दर्जेदार मराठी कलाकृती महाराष्ट्राबाहेरील रसिकांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने हे महत्त्वपूर्ण पाऊल ठरले आहे.