Alia Bhatt: मुलाखतीमध्ये आलियाचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, ‘घरी जा घरी’

Alia Bhatt: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) ही लवकरच हार्ट ऑफ स्टोन या अॅक्शन थ्रिलर सिनेमातून हॉलिवूडमध्ये (Hollywood)  एन्ट्री मारत आहे. या सिनेमात गॅल गॅडोट आणि जेमी डोर्नन हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारले आहे. सध्या हार्ट ऑफ स्टोन (Heart of Stone) या सिनेमाची टीम या सिनेमाचे प्रमोशन करत आहे.   View this […]

Alia Bhatt

Alia Bhatt

Alia Bhatt: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) ही लवकरच हार्ट ऑफ स्टोन या अॅक्शन थ्रिलर सिनेमातून हॉलिवूडमध्ये (Hollywood)  एन्ट्री मारत आहे. या सिनेमात गॅल गॅडोट आणि जेमी डोर्नन हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारले आहे. सध्या हार्ट ऑफ स्टोन (Heart of Stone) या सिनेमाची टीम या सिनेमाचे प्रमोशन करत आहे.


हार्ट ऑफ स्टोन या सिनेमाचं प्रमोशन करण्यासाठी आलिया भट्ट, गॅल गॅडोट आणि जेमी डोर्नन यांनी एका मुलाखतीला हजेरी लावली होती. या मुलाखती दरम्यान आलियाचा तो व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओला चाहत्यांनी कमेंट करुन अनेकांनी ट्रोल केले आहे. आलिया भट्ट, गॅल गॅडोट आणि जेमी डोर्नन यांच्या मुलाखतीचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

यामध्ये आलियाच्या देहबोलीला पाहून नेटकऱ्यांनी तिला चांगलंच ट्रोल केले आहे. या व्हिडीओत असे दिसून येत आहे की, आलिया अनेकवेळा तिच्या केसांना हात लावली आहे, तसेच हातामधील रिंग १० वेळा काढत आहे. या मुलाखतीच्या दरम्यान आलियाची देहबोली ही एखाद्या प्रोफेशनल अॅक्टरप्रमाणे नव्हती, असं नेटकऱ्यांनी तिला सुनावलं आहे.

72 Hoorain Trailer Out : सेन्सॉर बोर्डाचा विरोध असताना ’72 हुरैन’चा ट्रेलर प्रदर्शित

हार्ट ऑफ स्टोन या सिनेमाच्या टीमच्या मुलाखती दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडीओला एका नेटकऱ्याने चांगलीच कमेंट केली आहे, ‘आलियाची देहबोली ही खूपच विचित्र दिसून आली आहे. ती प्रोफेशनल वाटत नव्हती.’ तर दुसऱ्या युझरने कमेंट केली आहे की, ‘आलियाच्या चेहऱ्यावरील हावभाव खूपच विचित्र होते’. ‘आलिया, घरी जा घरी’ अशी कमेंट देखील एका नेटकऱ्याने तिला केली आहे. आलियाचा हार्ट ऑफ स्टोन हा सिनेमा ११ ऑगस्ट रोजी नेटफ्लिक्स (Netflix) या OTT प्लॅटफॉर्मवर लवकरच रिलीज होणार आहे.

तसेच आलिया ही ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या हिंदी सिनेमामधून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात आलिया आणि रणवीर सिंह यांचा रोमँटिक अंदाज चाहत्यांना पाहायला मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. या सिनेमात आलिया भट्ट आणि रणवीर सिंहसह धर्मेंद्र, जया बच्चन आणि शबाना आझमी हे महत्त्वाच्या भूमिकेत दिसून येणार आहेत. आलियाच्या आगामी सिनेमाची चाहते मोठ्या उत्सुकतेने वाट पाहत आहेत.

Exit mobile version