‘माया’च्या कथेला नवी उंची देणारे ‘मन गाईना सुरात’ गाणे प्रदर्शित

दिग्दर्शक आदित्य इंगळे म्हणतात, “ ‘मन गाईना सुरात’ हे आमच्या चित्रपटातील खूप खास गाणे आहे.

  • Written By: Published:
Song

‘माया’ या चित्रपटातील ‘मन गाईना सुरात’ हे (Song) गाणे नुकतेच प्रदर्शित झाले असून, ते संगीतप्रेमींच्या पसंतीस उतरत आहे. आयुष्याकडे नव्या दृष्टीने पाहाण्याचा संदेश देणारे हे गाणे ऐकताना एक वेगळीच ऊर्जा जाणवते.

‘मन गाईना सुरात’ ह्या गाण्याचे सुंदर शब्द आणि सुरेल धून यामुळे हे गाणे प्रेक्षकांना भावत आहे. या गाण्यातील दृश्यांमध्येही प्रकाश, रंग आणि हसरे क्षण यांची सुंदर सांगड घालत प्रसन्न वातावरण निर्माण करण्यात आले आहे. या गाण्याला अंजली मराठे हिचा सुरेल आवाज लाभला असून वैभव जोशी यांचे शब्द लाभले आहेत. तसेच पार्थ उमराणी यांचे भावपूर्ण संगीत या गाण्यात अधिकच रंगत आणते.

मोठी घोषणा! प्रतिष्ठेचा ‘INCA Awards’ 15 व 16 एप्रिल रोजी मुंबईत

दिग्दर्शक आदित्य इंगळे म्हणतात, “ ‘मन गाईना सुरात’ हे आमच्या चित्रपटातील खूप खास गाणे आहे. मनाचे विविध विभ्रम, संभ्रम दाखवणारे हे गाणे चित्रपटातील अव्यक्त भावना सुरेलपणे व्यक्त करते. निर्माते नितीन वैद्य म्हणतात, “ ‘माया’मधील ‘मन गाईना सुरात’ प्रेक्षकांना सकारात्मक ऊर्जा देईल. कथानकाच्या महत्त्वाच्या टप्प्यावर येणारे हे गाणे चित्रपटाचा चित्रपटाच्या कथेला आकार देते. साधे, शांत संगीत आणि भावना यामुळे हे गाणे प्रेक्षकांच्या आवडेल याची मला खात्री आहे.”

शालिनी सिनेमाज आणि नितीन वैद्य प्रॉडक्शन निर्मित या चित्रपटाचे निर्माते डॉ. सुनील दातार, अलका मधुकर दातार आणि नितीन प्रकाश वैद्य आहेत. आदित्य इंगळे दिग्दर्शित ‘माया’ हा चित्रपट २७ फेब्रुवारी २०२६ रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सिद्धार्थ चांदेकर, मुक्ता बर्वे, गिरीश ओक, विजय केंकरे आणि रोहिणी हट्टंगडी यांच्या व्यक्तिरेखा आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर उभ्या असलेल्या माणसांच्या भावविश्वाचे प्रभावी प्रतिनिधित्व करतात.

Tags

follow us