Alibaba Aani Chalishitale Chor Mukta Barve Emotional appeal : नितीन वैद्य प्रॉडक्शन्स प्रस्तुत, मृदगंध फिल्म्स एलएलपी निर्मित ‘अलीबाबा आणि ‘चाळिशी’तले चोर’ ( Alibaba Aani Chalishitil Chor ) नुकताच प्रदर्शित झाला. प्रेक्षक त्यावर भरभरून प्रेम करत आहेत. चित्रपटाच्या यशाचा आनंद साजरा करत आहेत. या चित्रपटाच्या पायसरीबाबतची बातमी समोर आली आहे. चित्रपटाच्या संपूर्ण टीमसह अभिनेत्री मुक्ता बर्वेकडून ( Mukta Barve ) प्रेक्षकांना असे आवाहन करण्यात आले आहे की, आम्ही हे चित्रपट प्रेक्षकांसाठीच बनवतो. त्यामुळे कृपया चित्रपट सिनेमागृहात जाऊनच पाहा.
Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का? गोविंदाने स्पष्टच सांगितले
मुक्ता बर्वेने म्हटलं की, ‘अलीबाबा आणि ‘चाळिशी’तले चोर’ हा चित्रपट रिलीज झाल्यापासून प्रेक्षकांच्या अनेक चांगल्या प्रतिक्रिया आल्या. चित्रपटगृहांमध्ये चांगलं बुकिंग होत आहे. एकीकडे हे सगळं कौतुक चालू असताना अचानक एक वाईट बातमी आली की, चित्रपटाची पायरसी होत आहे. हा खूप मोठा गुन्हा आहे. तसेच चित्रपटाच्या सर्व टीमवर हा मोठा अन्याय आहे. त्यामुळे मी मराठी सिनेमावर, नाटकावर प्रेम करणाऱ्या प्रेक्षकांना आवाहन करते की, या पायरसीला बळी पडू नका. चित्रपटगृहांमध्ये बघण्यासाठी चित्रपट बनवलेला असतो. तो तुम्ही तिथेच बघा. पायरसी आळा घालणे गरजेचे आहे. तुम्हाला असं काही होत नाही.
‘लव्ह अँड वॉर’मध्ये आलियाची भूमिका कशी असेल? संजय लीला भन्साळींने सांगितला ‘तो’ किस्सा
दरम्यान या विरोधात संदिप देशपांडे, अभिनेते अतुल परचुरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर (Amey Khopkar) यांनी मुंबई सायबर सेलकडे तक्रार केली आहे. तसेच या प्रकरणात मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती (Deven Bharti) यांची भेट घेऊन मराठी चित्रपटसृष्टी डॅमेज करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
राज्यात पुन्हा एका मराठी चित्रपटावरून राजकारण तापण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी मनसे नेते संदीप देशपांडे यांनी हा मुद्दा उपस्थित केला आहे. त्यांनी या प्रकरणात मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती यांची भेट घेऊन मराठी चित्रपटसृष्टी डॅमेज करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. नाहीतर आम्ही त्यांना मनसे स्टाईलने उत्तर देऊ असा इशाराही दिला आहे.