Download App

All the Best: ‘ऑल द बेस्ट’ नाटकाला उदंड प्रतिसाद; कलाकारांच्या नवीन संचाचा 50वा प्रयोग होणार संपन्न

All the Best Natak: ‘ऑल द बेस्ट’!! (All the Best Natak ) हे नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर हाऊस फुल्ल धुमाकूळ घालत आहे.

All the Best: मराठी रंगभूमीवर खणखणीत वाजलेलं व गाजलेलं नाटक म्हणजे देवेंद्र पेम लिखित-दिग्दर्शित ‘ऑल द बेस्ट’!! (All the Best Natak ) हे नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर हाऊस फुल्ल धुमाकूळ घालत आहे. देवेंद्र पेम लिखित हे नाटक 90च्या दशकाच्या सुरुवातीला विशेष गाजलं. (Marathi Natak) तीस वर्षांपूर्वी रंगभूमीवर दाखल झालेल्या या नाटकानं अनेक विक्रमांना गवसणी घातली आणि हजारो हाऊस फुल्ल प्रयोग करत रंगभुमीवर मोठा इतिहासचं घडवला. अनेक कलाकारांनी ऑल दि बेस्ट नाटकातून रंगभूमीवर पदार्पण केले.

अंकुश चौधरी भरत जाधव (Bharat Jadhav) संजय नार्वेकर (Sanjay Narvekar) हे सुपरस्टार झाले!!! या नाटकाने मराठीत अत्यंत कमी वर्षात 4500 प्रयोगांचा टप्पा गाठला आहे. ‘ऑल द बेस्ट’ने केवळ मराठीचं नाही तर विविध भाषीक प्रेक्षकांनाही अक्षरशः वेड लावलं. त्यामुळे हे नाटक आजवर 12 भाषांमध्ये प्रदर्शित झालं असुन त्याचे जवळ जवळ 10000 प्रयोग होत आले आहेत.

नाट्यरसिकांच्या आशीर्वादाने आणि सहकार्याने ‘अनामय’ नाट्यसंस्थेची निर्मिती असलेलं ‘ऑल दि बेस्ट’ हे नाटक पुन्हा रंगभूमीवर नवीन संचात रूजू झालं आहे. आता ता नाटकातील नवीन संचातील कलाकारांना माय-बाप रसिक प्रेक्षक उदंड प्रतिसाद देत आहेत. ज्यांनी हे नाटक 25 वर्षांपूर्वी पाहिल होत ते त्यांच्या मुलांना नाटक बघायला घेऊन येत आहेत!!! त्यामुळे तरुण पिढी सुद्धा थिएटरकडे वळली आहे. म्हणुनच अवघ्या 3 महिन्यात या नाटकाचा गौरवशाली असा 50 वा प्रयोग येत्या 5 मे रोजी श्री शिवाजी मंदिर, दादर येथे दुपारी 3.30 वाजता संपन्न होत आहे.

2 महिन्यातच गाशा गुंडाळला; ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ घेणार प्रेक्षकांचा निरोप! कलाकार झाले भावूक

या गौरवशाली प्रयोगाबाबत बोलताना लेखक- दिग्दर्शक देवेंद्र पेम म्हणाले की, “आजवर या नाटकाला नाट्यप्रेमींनी भरभरून प्रतिसाद दिला, अपार प्रेम केलं. या नाटकाची लोकप्रियता आजही तितकीच आहे. आता नव्या संचात हे नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर धुमाकूळ घालत आहे. हे नाटक लवकरच विश्वविक्रमी टप्पा गाठेल याची खात्री आहे.

30 वर्षांपूर्वी आलेलं हे नाटक नव्या कलाकारांच्या संचात पुन्हा येऊन त्यांनी 50 प्रयोगांचा टप्पाही गाठला आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये विनोदाची थंडगार धबधबा घेऊन हे नाटक पुन्हा एकदा रंगमंचावर धुमाकूळ घालायला सज्ज झालं आहे. या नाटकाच्या नव्या संचात मयुरेश पेम, मनमीत पेम, विकास पाटील व रिचा अग्निहोत्री हे कलाकार पाहायला मिळत आहेत.

follow us

वेब स्टोरीज