Download App

Pushpa 2 : पायात घुंगरू अन् उधळला गुलाल; अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा 2’चा धमाकेदार टिझर रिलीज

Allu Arjun Pushpa 2 Movie Teaser Release: दक्षिणेचा अभिनेता अल्लू अर्जुन (Allu Arjun) ‘पुष्पा: द रुल’ या (Pushpa 2 Movie ) चित्रपटामुळे बऱ्याच दिवसांपासून जोरदार चर्चेत आहे. त्याचा टीझर रिलीज करण्याची तयारी बऱ्याच दिवसांपासून सुरू होती. (Pushpa 2 Teaser )आता चाहत्यांची प्रतीक्षा संपली असून ‘पुष्पा 2’चा धमाकेदार टीझर रिलीज झाला आहे. अल्लू अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त या चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. तो आज 42 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यांचा जन्म 8 एप्रिल 1982 रोजी चेन्नई येथे झाला. त्यांचा हा वाढदिवस खूप खास ठरणार आहे. या दिवशी, ‘पुष्पा 2’ ची पहिली झलक दाखवण्यात आली आहे.

रिलीज झालेल्या ‘पुष्पा 2’ च्या टीझरमध्ये अल्लू अर्जुन अतिशय राक्षसी स्टाईलमध्ये दिसत आहे. व्हिडिओमध्ये अभिनेता साडीत दिसत आहे. त्याने गळ्यात फुलांचा हार आणि लिंबाचा माळा घातला आहे. तसेच नाकात नथ, अंगठी घातलेले आणि हातात त्रिशूळ धरलेले, शंख फुंकताना दिसत आहे. यात त्याची शैली ‘पुष्पा’पेक्षाही धोकादायक आहे. त्याचे चाहते हा लुक पाहून खूप कौतुक करत आहेत आणि आता या टीझरने प्रेक्षकांची चित्रपटाबद्दलची उत्सुकता चांगलीच वाढवली आहे.

टीझरपूर्वी पोस्टर रिलीज

टीझरपूर्वी अल्लू अर्जुनने इन्स्टाग्रामवर चित्रपटाचे पोस्टर शेअर केले होते. यामध्ये त्याचा डॅशिंग लूक पाहायला मिळाला. हे शेअर करण्यासोबतच, अभिनेत्याने पोस्टमध्ये असेही म्हटले आहे की, चित्रपटाचा टीझर त्याच्या वाढदिवसानिमित्त दुसऱ्या दिवशी म्हणजेच 8 एप्रिल रोजी प्रदर्शित केला जाईल. ही पोस्ट समोर आल्यानंतर चाहते खूप उत्सुक झाले आणि ते त्याच्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता टीझर रिलीज झाल्यानंतर चाहत्यांच्या आनंदाला सीमा उरली नाही.

याआधी अल्लू अर्जुनचे अनेक पोस्टर्स आणि कूल लूक चित्रपटातून रिलीज करण्यात आले आहेत. त्याचवेळी रश्मिका मंडनाच्या श्रीवल्लीचा लूकही समोर आला आहे. त्यातही ती अतिशय दमदार स्टाईलमध्ये दिसली.

Sunder Kokanraj Song : गारवा फेम गायक मिलिंद इंगळेचं नवं गाणं पाहिलंत?

फहाद फासिलशी स्पर्धा करेल

‘पुष्पा 2’ च्या कथेबद्दल सांगायचे तर, फहद फासिल आणि अल्लू अर्जुन यांच्यातील चुरशीची लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाच्या पहिल्या सिक्वेलमध्ये दोघांमध्ये खूप तणाव निर्माण झाला होता. त्याचसोबत अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना यांच्या घरगुती आयुष्यातील पुढील भाग देखील पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटात काही नवे चेहरेही पाहायला मिळणार आहेत. 15 ऑगस्ट 2024 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.

‘पुष्पा’च्या यशानंतर अल्लू अर्जुनने चाहत्यांना वचन दिले होते की त्याचा दुसरा सिक्वेल आणखी दमदार होणार आहे. टीझर पाहता, त्याने दिलेले वचन पूर्ण केले आहे यात शंका नाही. याचे दिग्दर्शन सुकुमार करत आहेत.

follow us

वेब स्टोरीज