Download App

Pushpa 2 : अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा 2’ची रिलीज डेट पुन्हा पुढे ढकलली, आता चित्रपट कधी प्रदर्शित होणार?

Pushpa 2 The Rule Postponed: अल्लू अर्जुनचा ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा'चा सीक्वल 'पुष्पा: द रुल' हा 2024 मधील बहुप्रतिक्षित चित्रपट आहे.

Pushpa 2 The Rule Postponed: अल्लू अर्जुनचा (Allu Arjun) ब्लॉकबस्टर चित्रपट ‘पुष्पा’चा (Pushpa) सीक्वल ‘पुष्पा: द रुल’ (Pushpa 2 The Rule ) हा 2024 मधील बहुप्रतिक्षित चित्रपट आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे. (Pushpa 2 The Rule Postponed) खरंतर, ‘पुष्पा 2’ ची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आल्याची अफवा पसरवली जात आहे. या बातमीनंतर चाहते खूपच निराश झाल्याचे पाहायला मिळत आहेत.


‘पुष्पा 2’ 15ऑगस्टला प्रदर्शित होणार नाही? 

‘पुष्पा: द रुल’ 15 ऑगस्टला रिलीज होणार होता, पण आता या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहेत. म्हणजेच, हा चित्रपट त्याच्या नियोजित रिलीजच्या तारखेला थिएटरमध्ये येणार नाही, खरं तर 12 जून रोजी ‘पुष्पा 2’ काही महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात आल्याची माहिती सोशल मीडियावर पसरली होती. मात्र, ‘पुष्पा: द रुल’च्या निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.

‘पुष्पा 2’ का पुढे ढकलण्यात आला?

अफवांच्या मते, पुष्पा 2 ची रिलीज डेट पुढे ढकलण्याचे कारण म्हणजे चित्रपट अद्याप पूर्ण झालेला नाही. दिग्दर्शक सुकुमार यांनी अद्याप चित्रपटाचे शूटिंग आणि पोस्ट प्रोडक्शनचे काम पूर्ण केलेले नसल्याचे सांगितले जात आहे.

बॉलीवूड हंगामाच्या वृत्तानुसार, चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलल्याबद्दल पसरलेल्या अफवांची माहिती एका आतल्या व्यक्तीने दिली आहे. सूत्राने सांगितले की, “पुष्पा 2 नियोजित प्रमाणे 15 ऑगस्ट रोजी पडद्यावर येईल की प्रत्यक्षात पुढे ढकलले जाईल, याबाबत अद्याप कोणतेही निश्चित माहिती समोर आली नाही. सध्या निर्माते परिस्थितीचे आकलन करत असून येत्या काही दिवसांत अंतिम निर्णय घेतला जाईल.

पुष्पा पुष्पा द कपल सॉन्ग Pushpa 2 : The Rule मधील दोन्ही गाण्यांची नेटकऱ्यांना भूरळ!

‘पुष्पा: द रुल’चा टीझर आणि दोन गाणी रिलीज

या सगळ्या दरम्यान, ‘पुष्पा 2’ च्या निर्मात्यांनी चित्रपटाचा टीझर आणि दोन गाणी रिलीज केली आहेत. दिग्दर्शक सुकुमार आणि अल्लू अर्जुन यांचा ‘पुष्पा: द रुल’ हा ‘पुष्पा: द राइज’ या चित्रपटाचा सिक्वेल आहे, ‘पुष्पा 1’ डिसेंबर 2021 मध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता, या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. अल्लू अर्जुन, फहद फासिल आणि रश्मिका मंदान्ना स्टारर चित्रपटाचा सिक्वेल एका वर्षाहून अधिक काळापासून तयार आहे.

follow us

वेब स्टोरीज