जोडीदारासाठीच्या विचित्र अपेक्षांची पोस्ट व्हायरल… फोटोतील तरुणी म्हणते ‘ती’ मी नव्हेच

एका तरुणीने आपल्या होणाऱ्या पतीसाठी तब्बल 11 अटी मांडल्या असून, त्या वाचून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

  • Vishal Aarde
  • Written By: Published:
Untitled Design (40)

Post about expectations for a partner goes viral : लग्नासाठी जोडीदार निवडताना मुला-मुलींच्या अपेक्षा दिवसेंदिवस वाढत असल्याची चर्चा समाजात नेहमीच होत असते. शिक्षण, करिअर, आर्थिक स्थैर्य आणि जीवनशैली यांसारख्या अनेक बाबींमुळे विवाहासाठीच्या निकषांमध्ये मोठे बदल झाले आहेत. अशातच सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका पोस्टने नेटकऱ्यांमध्ये जोरदार चर्चा रंगवली आहे. या पोस्टमध्ये एका तरुणीने आपल्या होणाऱ्या पतीसाठी तब्बल 11 अटी मांडल्या असून, त्या वाचून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. त्यात आता ट्विस्ट आला असून त्या पोस्टमध्ये वापरलेला फोटो माझाच असून ती पोस्ट केलेले अकाउंट माझे नसल्याचा दावा संबंधित तरुणीने केला आहे.

व्हायरल झालेल्या पोस्टनुसार, संबंधित तरुणीने लग्नासाठी जोडीदार निवडताना काही विशिष्ट अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. तिच्या मते, होणारा नवरा अविवाहित आणि व्हर्जिन असावा, त्याचा मासिक पगार किमान दोन लाख रुपये असावा, तो दिसायला आकर्षक आणि नैसर्गिकरित्या देखणा असावा तसेच त्याची उंची किमान सहा फूट असावी. एवढेच नव्हे तर त्याला स्वयंपाक करता आला पाहिजे, त्याने मद्यपान करू नये आणि सोशल मीडियाचा वापरही करू नये, अशी अटही पोस्टमध्ये नमूद करण्यात आली आहे.

याशिवाय संबंधित व्यक्तीची कोणतीही महिला मैत्रीण नसावी, घराबाहेर जाताना त्याने परवानगी घ्यावी, सतत स्वतःचे लोकेशन शेअर करावे आणि पत्नीला नियमित परदेशवारीवर घेऊन जावे, अशाही अपेक्षा या पोस्टमध्ये व्यक्त करण्यात आल्या आहेत. या सर्व अटी पूर्ण करणारा मुलगा कुठे सापडेल, असा प्रश्नही पोस्टच्या शेवटी विचारण्यात आला आहे.

टाटा समूहासाठी कोण होते अध्यक्ष नटराजन चंद्रशेखरन? अचानक राजीनाम्यामने वृत्ताने उद्योगविश्वाला कसा बसला धक्का?

ही पोस्ट सुरुवातीला ट्विटरवर शेअर करण्यात आली होती. मात्र त्यानंतर ती इन्स्टाग्रामसह इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली. पोस्टवर हजारो प्रतिक्रिया उमटल्या असून अनेकांनी या अपेक्षा वास्तववादी आहेत का, असा प्रश्न उपस्थित केला आहे. काहींनी या अटी अतिशय अवास्तव असल्याचे म्हटले आहे, तर काहींनी प्रत्येक व्यक्तीला आपल्या जोडीदाराबाबत अपेक्षा ठेवण्याचा अधिकार असल्याचे मत व्यक्त केले आहे.

दरम्यान, ही पोस्ट खरोखरच गंभीरपणे करण्यात आली आहे की विनोदी अथवा उपरोधिक स्वरूपात लिहिण्यात आली आहे, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र या पोस्टमुळे लग्नासाठी जोडीदार निवडताना अपेक्षा किती असाव्यात आणि वास्तव व अपेक्षा यामधील समतोल कसा साधावा, याबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

सोशल मीडियावरील या व्हायरल पोस्टने केवळ मनोरंजनच केलेले नाही, तर आधुनिक काळातील विवाहसंस्थेबाबत बदलणारी मानसिकता, वाढत्या अपेक्षा आणि जोडीदार निवडीचे निकष यांवरही मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या तरुणीने समोर येत संबंधित प्रकारावर भाष्य केले आहे. संबंधित पोस्टमधील फोटो माझाच असून ते सोशल मीडिया अकाउंट माझे नसल्याचा आरोप करत. एबीपी माझा या वृत्तवाहिनीवर चुकीच्या पद्धतीने माझा फोटो वापरला असल्याचा गंभीर आरोप केला आहे.

follow us