Download App

अल्लू अर्जुन जोरदार! ओटीटी प्लॅटफॉर्मने तब्बल इतक्या कोटींना विकत घेतले ‘पुष्पा 2’चे हक्क

Pushpa 2 OTT Rights: चाहते अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) ‘पुष्पा 2’ ची (Pushpa 2) आतुरतेने वाट पाहत आहेत. त्याचा पहिला भाग हिट झाल्यानंतर दुसऱ्या भागाची खूपच क्रेझ वाढली आहे. (OTT ) निर्माते दररोज ‘पुष्पा 2’ बाबत काही ना काही अपडेट शेअर करत असतात, त्यामुळे लोकांमध्ये याबद्दल चर्चा आहे. कधी चित्रपटातील कोणाचा तरी लूक पोस्टर शेअर करण्यात आला आहे तर नुकताच अल्लू अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. आता चित्रपटाच्या ओटीटी अधिकारांबाबत महत्वाची माहिती देण्यात आली आहे.

‘पुष्पा 2’वर निर्माते पाण्यासारखे पैसे खर्च करत आहेत. चित्रपटाचे बजेट एसएस राजामौली यांच्या आरआरआरच्या बरोबरीने पोहोचले आहे. चित्रपटाच्या 6 मिनिटांच्या एका दृश्यासाठी निर्मात्यांनी 60 कोटी रुपये खर्च केले होते. हा सीन शूट करण्यासाठी जवळपास एक महिना लागला. हा सीन देखील टीझरचा एक भाग आहे. आता या चित्रपटाचे ओटीटी हक्कही खरेदी करण्यात आले आहेत.

‘या’ व्यासपीठाने हक्क विकत घेतले

बॉलीवूड लाईफमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, नेटफ्लिक्सने पुष्पा 2 चे डिजिटल अधिकार विकत घेतले आहेत. रिपोर्टनुसार, नेटफ्लिक्सने पुष्पा 2 चे हक्क 100 कोटी रुपयांना विकत घेतले आहेत. जो सालार आणि आरआरआर या दोन्हीपेक्षा खूपच कमी आहे. रिपोर्टनुसार, नेटफ्लिक्सने या चित्रपटाचे हक्क 100 कोटी रुपयांना विकत घेतले आहेत. तर सालार 162 कोटी रुपयांना आणि आरआरआरला 350 कोटी रुपयांना विकत घेतले. पुष्पा 2 च्या जागतिक संगीत हक्क आणि हिंदी सॅटेलाइट अधिकारांबद्दल बोलायचे तर, टी-सीरीजने त्यांना 60 कोटी रुपयांना विकत घेतले आहे.

बजेट RRR इतके आहे

‘पुष्पा 2’चे प्रत्येक सीन परिपूर्ण करण्यासाठी निर्माते खूप मेहनत घेत आहेत. या चित्रपटावर त्यांनी खूप पैसा खर्च केला आहे. त्यानंतर चित्रपटाचे बजेट 500 कोटींच्या आसपास पोहोचले आहे. तर RRR चे बजेट 550 रुपये होते.

‘दिवसा बाजार आणि रात्री…’; ‘हिरामंडी’ बनवण्यासाठी निर्मात्याला का लागले 14 वर्षे?, समोर आलं कारण

पुष्पा 2 चा टीझर रिलीज

अल्लू अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त निर्मात्यांनी चाहत्यांना एक गिफ्ट दिले आहे. या चित्रपटाचा टीझर 8 एप्रिल रोजी प्रदर्शित झाला होता. नुकतचं पुष्पा मधील अल्लू अर्जुनचे पोस्टर रिलीज करण्यात आले, ज्यामध्ये तो शिवाच्या अवतारात दिसत होता.

follow us