Download App

Amey Wagh: मराठमोळ्या अभिनेत्याचा नवा प्रयोग, थेट स्वतःचे व्हॉट्सअँप चॅनेल सुरू केले

Amey Wagh WhatsApp Chanel Launching: मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेता म्हणून अमेय वाघ (Amey Wagh) ओळखला जातो. 

Amey Wagh WhatsApp Chanel Launching: मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेता म्हणून अमेय वाघ (Amey Wagh) ओळखला जातो. काला पानी, असूर यांसारख्या हिंदी वेबसीरिज, दिल दोस्ती दुनियादारी सारखी लोकप्रिय सिरीयल आणि फास्टर फेणे, मुरांबा, धुरळा यांसारख्या असंख्य चित्रपटांमधून अमेयने आजपर्यंत रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. आजही अमेयचे अनेक प्रोजेक्ट्स लाईन अप आहेत. त्याबद्दल अमेय सोशल मिडियावर (Social Media) चाहत्यांशी नेहमी संवाद साधत असतो. आता अमेय त्याच्या चाहत्यांसाठी एक भन्नाट बातमी घेऊन आला आहे. ‘ती’ म्हणजे अमेयने डिजिटल (Digital) युगात आणखी एक पाऊल टाकले आहे.


जर तुम्हाला एखाद्या व्यक्ती सोबत संपर्क साधायचा असेल तर तुम्ही कॉल किंवा त्या व्यक्तीला बघण्यासाठी व्हिडीओ कॉल करू शकता इतके नाही तर या अँप्सचे फीचर्स वापरकर्त्यांना साधे आणि उपयोगी आहेत. व्हाट्सअँप या अँपवर तुम्ही तुमचे स्वतःचे कॅनल देखील तयार करू शकता जेणे करून तुमचे सर्वांसोबतचे नाते आणि संवाद वाढतील. याच फीचर्सचा वापर करून आपला लाडका अभिनेता अमेय वाघ त्याच्या चाहत्यांसोबत घट्ट नाते निर्माण करण्यासाठी सज्ज झाला आहे.

अमेयने चाहत्यांशी दिल से कनेक्ट होता यावे म्हणून स्वतःचे व्हॉट्सअँप चॅनेल सुरू केले आहे. असे करणारा मराठी सिनेसृष्टीतील अमेय वाघ हा पहिलाच कलाकार ठरला आहे. त्यामुळे इथून पुढे चाहत्यांना अमेयचे आगामी प्रोजेक्ट्स आणि प्रदर्शनाच्या तारखा आता एका क्लिकवर समजणार आहे. दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही अमेय झोन (AmeyZone) हे व्हॉट्सअँप चॅनेल फॉलो करु शकता. तेव्हा आजच व्हॉट्सअँप चॅनेल फॉलो करा आणि वाघ सेनेत सामील व्हा! ते नक्कीच या चॅनेलला प्रतिसाद देतील ही आशा आहे.

Marathi Cine Award 2023: ‘या’ दिवशी रंगणार फक्त मराठी सिने सन्मान 2023’

अमेय वाघबद्दल बोलायचं झालं तर… ‘दिल दोस्ती दुनियादारी’ सिरियलमधून अमेय खऱ्या अर्थाने खऱ्या अर्थाने लोकप्रिय झाला. या सीरियलमध्ये अमेयने साकारलेल्या ‘कैवल्य’ या भूमिकेचं खूप तोंडभरून कौतुक झालं. पुढे अमेयची भूमिका असलेले ‘फास्टर फेणे’, ‘झोंबिवली’, ‘जग्गू आणि ज्युलिएट’, ‘मुरांबा’, ‘मी वसंतराव’ अशा सिनेमांमधून त्याच्या अभिनयाची छाप पाडली. अमेयच्या नव्या प्रोजेक्टची सर्वांना खूप उत्सुकता आहे.

follow us