KaalaPaani Teaser: अमेय वाघची नवी हिंदी वेबसिरीज, ‘काला पानी’ चा टीझर प्रदर्शित 

KaalaPaani Teaser: अमेय वाघची नवी हिंदी वेबसिरीज, ‘काला पानी’ चा टीझर प्रदर्शित 

KaalaPaani Teaser: अमेय वाघची असूर ही वेबसिरीज (webseries) जोरदार गाजल्याचे बघायला मिळाले होते. गेल्या काही दिवसापासून या वेबसिरीजचा दुसरा सिझन चाहत्यांच्या भेटीला आला होता. (Teaser Out) तसेच आता या सिझनला देखील चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. (Social media) आता असुर नंतर अमेय वाघची (Amey Wagh) आणखी एक हिंदी वेबसिरीज चाहत्यांच्या पुन्हा एकदा भेटीला येत आहे. तिचं नाव म्हणजे ‘काला पानी’. नुकतंच या वेबसिरीजचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे.

एका जंगलामध्ये एक माणूस पळत असतो. तसेच अमेय वाघची पोलीस (Police) ऑफिसरच्या भूमिकेमध्ये हटके एन्ट्री होते. पुढे एक आदीवासी धनुष्यबाण रोखून धरत असल्याचे देखील बघायला मिळत आहे. आणि मधूनच एक तुरुंग बघायला मिळत आहे. आशुतोष गोवारीकर आणि मोना सिंग या दोन कलाकारांची हटके झलक बघायला मिळत आहे. परंतु या सिनेमाचा नेमका विषय जरी कळत नसला तरी देखील ही वेबसिरीज सस्पेस्न थ्रिलर असणार असल्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

काला पानी वेबसिरीजचा टिझर प्रदर्शित झाल्यावर त्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु झाली आहे. एवढेच नाही तर काही मराठी कलाकारांची एन्ट्री या सिरीजमध्ये बघायला मिळत आहे. अमेय वाघ हा मुख्य भूमिकेत दिसत आहे.  तसेच अभिनेता आणि दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर सुद्धा या वेबसिरीजमध्ये पोलीस अधिकाऱ्याची भूमिका बजावत आहेत. मराठमोळा अभिनेता चिन्मय मांडलेकर देखील या वेबसिरीजमध्ये झळकणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे.

Sai Pallavi Wedding: अभिनेत्री साई पल्लवीने गुपचूप उरकलं लग्न? ‘तो’ फोटो व्हायरल

यामुळेच अमेय वाघच्या या नव्या वेबसिरीजची सर्वांना खूपच उत्सुकता लागली आहे. काला पानी ही वेब सिरीज 18 ऑक्टोबर दिवशी प्रदर्शित करण्यात येणार आहे. नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ही वेबसिरीज बघायला मिळणार आहे. समीर सक्सेना आणि अमित गोलानी या दोघांनी मिळून या वेबसिरीजचं दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे तर बिस्वपती सरकारने ही वेबसिरीज लिहिले असल्याचे सांगितले जात आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube