Sai Pallavi Wedding: अभिनेत्री साई पल्लवीने गुपचूप उरकलं लग्न? ‘तो’ फोटो व्हायरल
Actress Sai Pallavi Wedding: सध्या मनोरंजनविश्वात लगीनघाई सुरू आहे. एकामागोमाग एक कलाकार विवाहबंधनात अडकत आहेत. सध्या साउथची अभिनेत्री साई पल्लवी ही देखील गुपचूप लग्न केल्याच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तसेच साई पल्लवी (Actress Sai ) ही कायम चर्चेत असते. साई पल्लवीचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. ती सोशल मीडियावर (Social media) कमी सक्रिय असली तरी तिच्या पोस्टची कायमच जोरदार चर्चा रंगत असल्याचे बघायला मिळत असते. (Photo Viral) साई आपल्या साधेपणासाठी आणि उत्तम अभिनयासाठी ओळखली जाते.
Adei 🤦♂️🤦♂️🤦♂️ pic.twitter.com/pk26NRPeFO
— Christopher Kanagaraj (@Chrissuccess) September 20, 2023
सध्या साईचा एक फोटो सोशल मीडियावर जोरदार धुमाकूळ घालत आहे. ज्यामध्ये ती वधुच्या वेशात बघायला मिळत आहे. यामुळे तिने लग्न केल्याच्या बातम्या सध्या वाऱ्यासारख्या पसरत आहेत. या फोटोमध्ये साई पल्लवी एका व्यक्तीसोबत बघायला मिळत आहे. त्यांच्या गळ्यामध्ये फुलांचा हार आहे. जणू त्यांनी वरमाला घातले असल्याचे दिसत आहे. या फोटोमुळे साई पल्लवीने लग्न केल्याची चर्चा सध्या रंगत आहे. अनेकांनी तिच्या त्या फोटोवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. परंतु हा फोटो तिच्या लग्नाचा नसून एका सिनेमाच्या शुटिंगच्या मुहूर्ताचा असल्याचे सांगितले जात आहे.
या फोटोत साई पल्लवीबरोबर तिचे सहकलाकार सिवा कार्तिकेयन बघायला मिळत आहेत. तसेच हा फोटो ‘एस के 21’ या सिनेमाच्या शूटिंगच्या दरम्यान काढला असल्याचे सांगितले जात आहे. सिनेमा दिग्दर्शक राजकुमार यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर हा फोटो शेअर केला आहे. यामध्ये तिच्याबरोबर सहकलाकार शिवकार्तिकेयन बघायला मिळत आहे. यामुळे चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. साईने लग्न केलं नाही हे ऐकून चाहते देखील पुन्हा एकदा खुश झाल्याचे दिसत आहे. साईने दाक्षिणात्य सिनेमामध्ये स्वतःचं एक अनोखं स्थान निर्माण केलं आहे.
Shilpa Shettyच्या घरच्या बाप्पाचं विसर्जन; ढोल-ताशाच्या तालावर बेभान नाचत दिला निरोप
गेल्या काही दिवसाखाली साऊथच्या काही प्रसिद्ध अभिनेत्रींमधील एक नाव म्हणजे अभिनेत्री साई पल्लवी. समांथा, रश्मिका सारख्या आघाडीच्या अभिनेत्रींत साई पल्लवीच्या नावाचं देखील नाव घेत असल्याचे बघायला मिळत असत. उत्तम अभिनयानं तिनं चांगलीच लोकप्रियता मिळवली आहे. तसेच साधी राहणी, नो मेकअप लुकनं तिनं स्वत:ची एक अनोखं स्थान निर्माण केल आहे. इतर अभिनेत्रींपेक्षा साई पल्लवी कायमच वेगळी ठरली आहे. ते म्हणजे तिच्या कपड्यांच्या स्टाइलमुळे आणि साधेपणामुळे.
साई पल्लवी नेहमी कॉटनचे ड्रेस किंवा साड्याच्या हटक्या लूकमध्ये बघायला मिळत असते. इतर अभिनेत्री आपल्या सौंदर्यानं चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असतात. तसेच वेस्टर्न कपडे, बिकिनी सारख्या ट्रेंडमध्ये साई पल्लवीनं स्वत:ला इतकं साध का ठेवलं या पाठीमागे देखील नेमकं कारण काय आहे. साई पल्लवीनं एका मुलाखतीच्या दरम्यान याबाबत खुलासा केला आहे, एकदा तिच्यासोबत एक घटना घडली असल्याचे तिने यावेळी सांगितले होते, त्यानंतर तिने तोकडे किंवा शॉर्ट कपडे घालणं बंद केल्याचे तिने यावेळी सांगितले आहे.