Download App

Ira Khan: ‘आत्महत्येचा विचार…’, आमिरच्या लेकीचा ‘तो’ व्हिडीओ चर्चेत

  • Written By: Last Updated:

Aira Khan Viral Video: बॉलीवूड अभिनेता (Bollywood) आमिर खानची (Aamir Khan) कन्या आयरा खान (Ira Khan) मनोरंजनसृष्टी नसली तरीही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जोरदार चर्चेत असते. (Social media) सोशल मीडियावर सक्रिय राहून ती तिच्या आयुष्याविषयीच्या गोष्टी उघडपणे चाहत्यांशी कायम शेअर करत असते. तसेच (Video Viral ) मध्यंतरी एका पोस्टमधून तिने काही वर्षांअगोदर खूप डिप्रेशनचा सामना केल्याचे देखील सांगितलं आहे.


परंतु नुकतंच ‘आत्महत्या’ (suicide subject) या विषयावर तिने स्पष्टीकरण दिल्याचे बघायला मिळत आहे. काल जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिन होता. यानिमित्त तिने आत्महत्या न करण्याविषयी जनजागृती केल्याचे बघायला मिळत आहे. काल तिने मुंबईतील एका कॅफे समोर ती पापाराझींना दिसून आली होती. यावेळी तिने आत्महत्या या विषयाबद्दल बोलत सर्वांना सावध केल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.

ती म्हणाली आहे की, “आज सुसाईड प्रिव्हेन्शन डे आहे. म्हणजेच आत्महत्या करण्यापासून एखाद्याला रोखण्याचा दिवस. आत्महत्या हा विचार खूप डेंजर आहे आणि याविषयी लोक कोणाला सांगू शकत नाहीत. परंतु जर तुम्ही त्यांना याविषयी विचारलं तर एक विश्वास वाटेल की कोणीतरी आहे, ज्याच्याशी मी याविषयी बोलू शकतो. अनेकांना वाटतं की जर आपण त्यांच्याशी या विषयावर बोललो तर त्यांच्या मनामधील आत्महत्येचे विचार येतील पण तसं होत नाही.

Vijay Sethupathi: ‘जवान’नंतर विजय झळकणार ‘या’ बड्या सिनेमात; पोस्टर आउट

हा तिचा व्हिडीओ सध्या जोरदार चर्चेत आला आहे, सध्या त्यावर अनेकांनी जोरदार कमेंट करत सकारात्मक प्रतिक्रिया देत असल्याचे सांगितले आहे. तर ती करत असलेल्या जनजागृतीविषयी अनेक जण तिचं जोरदार कौतुक होत असल्याचे बघायला मिळत आहे.

Tags

follow us