Download App

अयोध्येनंतर बिग बीं यांनी अलिबागमध्ये खरेदी केली कोट्यवधींची प्रॉपर्टी; किंमत वाचून भुवया उंचावतील

Amitabh Bachchan New Property: बॉलिवूडचे (Bollywood) शहेनशाह अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी नुकतचं अयोध्येत राम मंदिर बांधल्यानंतर जमीन खरेदी केली होती. आता बिग बींनी अलिबागमध्ये 10 कोटी रुपयांची जमीन खरेदी केली आहे. द हाउस ऑफ अभिनंदन लोढा (HoABL) कडून 10 हजार चौरस फूट जमीन खरेदी करण्यात आली आहे. ही जमीन अलिबाग येथील प्रकल्पात खरेदी करण्यात आल्याची माहिती आहे. मात्र, या खरेदीवर अभिनेत्याने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.


हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, एका सूत्राने सांगितले की, अभिनेत्याने गेल्या आठवड्यात हा व्यवहार नोंदवला होता. अमिताभ बच्चन यांच्या आधी शाहरुख खान, दीपिका पदुकोण-रणवीर सिंग आणि अनुष्का शर्मा या स्टार्सनीही अलिबागमध्ये प्रॉपर्टी खरेदी केली आहे.

जानेवारीत अयोध्येत जमीन खरेदी केली

दरम्यान, यावर्षी जानेवारीमध्ये अमिताभ बच्चन यांनी अयोध्येत 14.5 कोटी रुपयांची जमीन खरेदी केल्याची बातमी आली होती. त्यावेळी हिंदुस्तान टाईम्सच्या एका वृत्तात बिग बींनी 10 हजार स्क्वेअर फूट पसरलेली जमीन खरेदी केली होती. त्याची किंमत 14.5 कोटी रुपये आहे. अयोध्या राम मंदिराच्या उद्घाटनाच्या काही काळ आधी ही खरेदी करण्यात आली होती.

अयोध्येत जमीन खरेदी केल्यानंतर बिग बी काय म्हणाले?

मालमत्तेच्या गुंतवणुकीबद्दल बोलताना बच्चन यांनी एका निवेदनात म्हटले होते की, “माझ्या हृदयात एक विशेष स्थान असलेल्या अयोध्येतील द हाऊस ऑफ अभिनंदन लोढा सह हा प्रवास सुरू करण्यासाठी मी उत्सुक आहे.” अयोध्येने भौगोलिक सीमांच्या पलीकडे एक भावनिक संबंध निर्माण केला आहे, जिथे परंपरा आणि आधुनिकता अखंडपणे सहअस्तित्वात आहे, “माझ्याशी खोलवर जोडणारी टेपेस्ट्री तयार करण्यास मी उत्सुक आहे.

Amruta Khanvilkar साठी 2024 ठरतयं खास; नव्या शोमध्ये झाकीर खानसोबत दिसणार

अमिताभ बच्चन यांच्या मुंबईतही अनेक मालमत्ता

अमिताभ यांच्याकडेही मुंबईत अनेक मालमत्ता आहेत. अभिनेता मुंबईत जलसा नावाच्या डुप्लेक्स बंगल्यात राहतो. हे घर 10 हजार 125 स्क्वेअर फूटमध्ये पसरले आहे. सुपरस्टार त्यांचा जास्तीत जास्त वेळ जलसामध्ये घालवतात. त्यांच्याकडे जलसाच्या मागे 8 हजार चौरस फुटांची मालमत्ता आहे, त्यांची तिसरी मालमत्ता प्रतीक्षा आहे, त्यांच्या कार्यस्थळाचे नाव जनक आणि वत्स आहे. ते सिटी बँक इंडियाला भाडेतत्त्वावर देण्यात आले आहे.

follow us