Amitabh Bachchan: ‘बिग बी’ अडकले ट्रॅफीकमध्ये? चाहत्याकडून लिफ्ट घेत शुटींगला Video Viral

Amitabh Bachchan Bike Riding Video Viral : बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) म्हणजेच आपल्या सर्वांचे ‘बिग बी’ (Big B) नेहमीच काहीतरी हटके करत असल्याचे आपल्या चाहत्यांना दिसून येत असतात. आपल्या चाहत्यांचे मनोरंजन देखील ते नेहमी करत असतात. सिनेमासृष्टीमध्ये सर्वात दिग्गज असून देखील बिग बी अमिताभ बच्चन सतत वेळेत सेटवर पोहोचण्याला पहिले प्राधान्य देत असतात. […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 05 15T115638.671

Amitabh Bachchan

Amitabh Bachchan Bike Riding Video Viral : बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) म्हणजेच आपल्या सर्वांचे ‘बिग बी’ (Big B) नेहमीच काहीतरी हटके करत असल्याचे आपल्या चाहत्यांना दिसून येत असतात. आपल्या चाहत्यांचे मनोरंजन देखील ते नेहमी करत असतात. सिनेमासृष्टीमध्ये सर्वात दिग्गज असून देखील बिग बी अमिताभ बच्चन सतत वेळेत सेटवर पोहोचण्याला पहिले प्राधान्य देत असतात. सध्या अमिताभ यांच्या ‘प्रोजेक्ट के’ या सिनेमाचे मुंबईमध्ये शूटिंग सुरू आहे.


मुंबईतील अनेक भागांमध्ये वाहतूककोंडीची मोठी समस्या निर्माण होत असते, अनेकदा नोकरदार वर्गाला कामावर पोहोचण्यास देखील उशीर होत असतो. अगदी असाच अनुभव बिग बी यांनाही आला आहे. सिनेमाच्या शूटिंगला वेळेत पोहोचण्यासाठी बिग बी यांनी चक्क एका अनोळखी दुचाकीस्वाराकडे ‘सेटवर सोडतोस का? असे विचारत मदत मागितली आहे. या व्यक्तीच्या बाईकवर बसून ते सेटच्या दिशेने रवाना झाले असल्याचे देखील चाहत्यांना दिसून आले आहेत.

यामुळे त्यांचे सर्व स्तरातून मोठ्या कौतुक होत आहे. त्यानंतर त्यांनी फोटो शेअर करून संबंधित दुचाकीस्वाराचे बिग बी यांनी आभार देखील मानले आहेत. अनोळखी व्यक्तीसोबतच्या बाईक राईडचा फोटो शेअर करत बिग बी लिहितात, ‘धन्यवाद मित्रा! तुझ्यामुळे मी सेटवर लवकर पोहोचू शकलो. मी तुला ओळखत नाही, पण तू मला मोठी मदत केली आहेस. ट्रॅफिकमधून मार्ग काढत तू मला वेळेत सोडला. मी तुझा आभारी आहे.

‘धकधक गर्ल’चा आज वाढदिवस, माधुरी दीक्षितचे सुरूवातीचे अनेक चित्रपट फ्लॉप, आज करोडोंच्या संपत्तीची मालकीण

बिग बी यांनी शेअर केलेल्या फोटोवर त्यांच्या अनेक चाहत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. यामध्ये अनेक जणांनी, मी तुम्हाला सोडायला रोज येत जाईन, असे देखील म्हणाले आहेत, तसेच काही जणांनी, तुम्ही दोघांनीही हेल्मेट न घालता हा प्रवास केला…” असे सांगत बिग बी यांना वाहतुकीच्या नियमांची देखील आठवण करून दिली आहे.

बिग बी’च्या त्यांच्या आगामी ‘प्रोजेक्ट के’ सिनेमातून चाहत्यांना भेटीला येणार आहेत. या बहुचर्चित सिनेमात बी यांच्यासह प्रभास आणि दीपिका पदुकोण हे मुख्य भूमिकेमध्ये दिसून येणार आहेत. १२ जानेवारी २०२४ रोजी मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर हा सिनेमा सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार असल्याची जोरदार चर्चा होत आहे.

Exit mobile version