Download App

Amitabh Bachchan: अमिताभ बच्चन यांनी लेक श्वेता बच्चन नंदाला मुंबईतील ‘प्रतीक्षा’ बंगला दिला भेट

Amitabh Bachchan Bungalow : महानायक बिग बीं म्हणजेच चाहत्यांचे लाडके अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी त्यांचा एक बंगला आपल्या लेकीला भेट म्हणून दिला आहे. बिग बींनी जुहूमधील आलिशान बंगला (Bungalow ) लेक श्वेता बच्चनच्या नावाने केला आहे. नुकतीच याबद्दल माहिती समोर आली आहे. या बंगल्याची किंमत कोट्यवधींच्या घरात आहे. बिग बीं यांच्याजवळ मुंबईमध्ये 3 आलिशान बंगले आहे, त्यापैकीच एक त्यांनी आपल्याला लेकीला दिला आहे.


विठ्ठलनगर को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटीमधील हा बंगला 774 चौरस मीटर आणि 890.70 चौरस मीटरच्या दोन भूखंडांमध्ये पसरलेला आहे. याची एकत्र किंमत अंदाजे 50.63 कोटी रुपये इतके आहे. 8 नोव्हेंबर दिवशी दोन्ही भूखंडांच्या कागदपत्रांवर सही करण्यात आली आणि नोंदणीसाठी 50.65 लाख रुपये मुद्रांक शुल्क भरण्यात आले आहे. याविषयीच्या माहितीला ‘इंडिया टुडे’ने दुजोरा दिला आहे. जुहूमधील हा बंगला आता श्वेता बच्चनच्या नावावर झाला आहे.

श्वेता बच्चन नंदा एक उत्तम लेखिका आहे आणि उद्योजक आहे. तिने ‘पॅराडाईज टॉवर्स’ ही बेस्ट सेलिंग कादंबरी लिहिली आहे. तिला नव्या नवेली नंदा आणि अगस्त्य नंदा ही दोन अपत्ये असल्याची माहिती समोर आहे.

Joram Trailer: ‘लेकीला वाचवतानाचा वडिलांचा संघर्ष…’, पाहा अंगावर शहारे आणणारा ‘जोरम’चा ट्रेलर

बिग बीं त्यांच्या करिअरच्या सुरुवातीला कुटुंबासह अनेक वर्षे ‘प्रतिक्षा’मध्ये राहत होते. शिवाय त्यांच्याकडे जुहूमध्य ‘जलसा’ आणि ‘जनक’ असे दोन बंगले अगोदर होते. सध्या ते कुटुंबासह ‘जलसा’ बंगल्यात राहत असल्याचे बघायला मिळत असतात. सध्या बिग बीं कौन बनेगा करोडपती हा शो होस्ट करत आहेत. शिवाय ते काही सिनेमाच्या शुटिंगमध्येही व्यस्त आहेत. नाग अश्विन यांच्या कल्कि 2998 AD मध्ये बच्चन बघायला मिळणार आहेत. या सिनेमात दीपिका पादुकोण आणि प्रभास यांच्याही मुख्य भूमिका आहेत. तसेच ते थैलाइवर 170 मध्येहीरजनीकांत यांच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहेत.

Tags

follow us