Download App

रणबीरच्या ‘रामायण’मध्ये रामाची एन्ट्री! अरुण गोविल यांच्यामुळे अमिताभ यांचा पत्ता कट?

Amitabh Bachchan Arun Govil : नितेश तिवारी (Nitesh Tiwari) यांच्या ‘रामायण’च्या (Ramayana) चर्चा थांबत नाहीत. चित्रपटाची स्टारकास्ट सतत चर्चेत असते. प्रभू रामाच्या भूमिकेत दिसणारा रणबीर कपूर (Ranbir Kapoor) सोबतच इतर अनेक पात्रांच्या नावांचा खुलासा करण्यात आला आहे. ‘रामायण’मध्ये रणबीरसोबत सई पल्लवी (Sai Pallavi) आणि यश मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटातील दशरथच्या भूमिकेसाठी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांना अप्रोच करण्यात आल्याची माहिती मिळाली होती. पण आता आणखी कोणीतरी ही भूमिका करताना दिसणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रामानंद सागर यांच्या ‘रामायण’मध्ये रामची भूमिका साकारणारा अरुण गोविलही (Arun Govil) नितेश तिवारीच्या चित्रपटाचा भाग असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता टीव्हीचा रामही रणबीर कपूरसोबत काम करताना दिसणार आहे. एका रिपोर्टनुसार, राजा दशरथची भूमिका यापुढे अमिताभ बच्चन करणार नाही तर अरुण गोविल यांनीच साकारणार असल्याची माहिती समोर आली आहेत. अरुण गोविल टीव्हीवरील ‘रामायण’ आणि नितेश तिवारीच्या ‘रामायण’मध्ये एक विशेष कनेक्शन निर्माण करणार असल्याचे मानले जात आहे.

Priyanka Chopra : ‘अनिफिनिश्ड’ आता हिंदीत; ‘अभी बाकी है सफर’ची जागतिक पुस्तक प्रदर्शनात एन्ट्री!

कसा असेल रणबीरचा लूक?: अरुण गोविल ‘रामायण’चा भाग बनणे ही प्रेक्षकांसाठी आनंदाची बातमी आहे. इतकेच नाही तर रणबीर कपूरच्या लूकबद्दल बऱ्याच दिवसांपासून वेगवेगळ्या चर्चा होताना दिसत आहेत. आता रणबीर साध्या लूकमध्ये रामाची भूमिका साकारणार असल्याचे मानले जात आहे. ते खूप जड म्हणून दाखवले जाणार नाहीत. तर नितीश तिवारी यांनी त्याला साधे आणि नैसर्गिक दिसण्यास सांगितले आहे.

शूर्पणखाच्या भूमिकेत रकुल प्रीत सिंग: नुकतचं नितेश तिवारीच्या (Nitesh Tiwari) ‘रामायण’ संदर्भात बातमी आली होती की अभिनेत्री रकुल प्रीत शूर्पणखाची भूमिका साकारताना दिसणार आहे. तर कैकेयीच्या भूमिकेसाठी लारा दत्ताची तर हनुमानाच्या भूमिकेसाठी सनी देओलची (Sunny Deol) निवड करण्यात आली आहे.

follow us