Download App

Amruta Khanvilkar: अमृताचा ‘लाईक आणि सबस्क्राईब’ चित्रपट ‘या’ दिवशी होणार महाराष्ट्रात प्रदर्शित, अखेर…

Like Ani Subscribe Release Date Announced: काही दिवसांपासून सोशल मीडियावर'आपण शोधायचं का रोहित चौहानला?’ अशी पोस्ट व्हायरल होत होती.

Like Ani Subscribe Release Date Announced: काही दिवसांपासून सोशल मीडियावर (Social Media) ‘आपण शोधायचं का रोहित चौहानला?’ अशी पोस्ट (Marathi Movie) व्हायरल होत होती. अनेकांना हा रोहित चौहान कोण असा प्रश्न पडला होता. ( Like ani Subscribe Movie ) तर आता हा रोहित चौहान कोण आहे, याचा 18 ॲाक्टोबरला लाईक आणि सबस्क्राईब’मधून उलगडा होणार असून या चित्रपटाचे एक नवीन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. पोस्टरमध्ये अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar), जुई भागवत आणि अमेय वाघ सेल्फी काढताना दिसत आहेत.


सेल्फीत हसणारे चेहरे दिसत असतानाच मागच्या चेहऱ्यांमध्ये मात्र काही रहस्ये दडलेली दिसत आहेत. हे चेहरे काही वेगळंच सांगत आहेत. त्यामुळे ‘लाईक आणि सबस्क्राईब’मागे हे काय गुपित आहे. हे चित्रपट पाहिल्यावरच कळणार आहे.नितीन वैद्य प्रॉडक्शन्स प्रस्तुत, एस. एन. प्रॉडक्शन्स एलएलपी आणि अभिषेक मेरूकर प्रॉडक्शन्स यांच्या सहकार्याने प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे नितीन प्रकाश वैद्य, अभिषेक मेरूकर निर्माते असून ‘लाईक आणि सबस्क्राईब’चे लेखन आणि दिग्दर्शन अभिषेक मेरूकर यांनी केले आहे.

या सिनेमात अमेय वाघ, अमृता खानविलकर, शुभंकर तावडे, विठ्ठल काळे, जुई भागवत अशी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. दिग्दर्शक अभिषेक मेरूकर म्हणतात, ‘’ लाईक आणि सबस्क्राईब हा दैनंदिन शब्द झाला आहे. रोजच्या जीवनात हा शब्द सर्रास ऐकला जातो आणि याच शब्दांभोवती फिरणारी कथा या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. हा एक रहस्यमय चित्रपट असून प्रेक्षकांना निश्चितच खुर्चीला खिळवून ठेवेल. येत्या 18ॲाक्टोबरला रोहित चौहान कोण आहे, याचा उलगडा होईल.’

Amruta Khanvilkar दिसणार नव्या रूपात; पुन्हा छोट्या पडद्यावर करणार कम बॅक!

चित्रपटाचे दिग्दर्शक घोषणेबाबत म्हणतात, “सोशल मीडिया सध्या सर्वांच्याच जिव्हाळ्याचा विषय बनला असून ‘लाईक आणि सबस्क्राईब ‘ या दोन क्रिया आपण रोजच्या जीवनात करतच असतो. अगदी वयस्कांपासून लहान मुलांच्या तोंडी हे शब्द सर्रास असतात. अनेकांना प्रश्न पडला असेल, की हे ‘लाईक आणि सबस्क्राईब’, रोहित चौहान काय प्रकरण आहे, तर याचा उलगडा 18 ऑक्टोबरला होणार आहे.’

follow us