Download App

जपानी पेहराव! अमृताच्या ‘या’ खास लूकचं रहस्य काय?

Amruta Khanvilkar Japan Trip Photos : अमृता सध्या (Amruta Khanvilkar) तिच्या सुट्टीचा आनंद घेत आहे. सोबतीला ती जपान सारख्या नव्या शहरात फिरताना दिसते. या ट्रीपच्या सुरुवातीपासून अमृता नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. अगदी तिकडच्या आगळ्या-वेगळ्या खाद्य संस्कृतीपासून ते तिकडच्या पारंपरिक अंदाजात अमृता बघायला मिळते. अमृताने जपानमधल्या वैविध्यपूर्ण ठिकाणांना (Amruta Khanvilkar Japan Trip) भेट तर दिली, पण तिथली संस्कृती देखील अनुभवली. याचे अनेक फोटो व्हिडिओ ती सोशल मीडियावर शेयर करताना दिसतेय.

जपानमधला चेरी ब्लॉसम असू देत किंवा तिथल्या अनोख्या पद्धतीचं जेवण असू दे, अमृता या सगळ्यांची मज्जा घेताना बघायला मिळतेय. अमृताने नुकताच तिकडचा पारंपरिक पोशाख ( किमोनो – kimono ) घातला होता. यात ती अगदीच एखाद्या जपानी स्त्रिया सारखी दिसत होती.

जेव्हढ तुमच्या देशाचं बजेट तेवढं भारताच्या लष्कराचं.. असदुद्दीन ओवैसींचा पाकिस्तानवर थेट वार

अमृता याबद्दल बोलताना सांगते की, पहिल्यांदा जपानमध्ये फिरताना अनेक नवनवीन गोष्टीचा अनुभव घेऊन इकडची खाद्य संस्कृती देखील अनुभवते. आज जपान फिरताना इथला पारंपरिक पोशाख कीमोनो परिधान केला. हा अनुभव कमाल होता. जपानची ट्रीप एकदम जोरदार सुरू आहे, पण इकडे येऊन अनेक नवनवीन गोष्टी बघायला मिळतात याचा खूप आनंद आहे.

मंगलाष्टका रिटर्न्स! 23 मे रोजी उलगडणार ‘सुलट प्रेमाची उलट गोष्ट’

अमृता कायम वेगवेगळ्या देशात शहरात फिरताना दिसते. तिथल्या गोष्टी ती सोशल मीडियावर शेयर करते. सोबतीला या ट्रीपमधले अमृताचे फॅशन लूक्स देखील तितकेच लक्ष वेधून घेणारे आहेत. चाहत्यांकडून तिच्या या फोटोंना प्रचंड पसंती मिळत आहे. अमृताने मागील वर्षी एकापेक्षा एक हिट प्रोजेक्ट्स केले आहेत. चाहतावर्ग देखील अमृताच्या वेगवेगळ्या भूमिकांना पसंती देताना दिसत आहे.

 

follow us