Download App

Amruta Khanvilkar: अमृता खानविलकर आणि अदिती रावची खास भेट, फोटो शेअर करत म्हणाली…

Amruta Khanvilkar And Aditi Rao: लोकप्रिय अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar)ने आपल्या अभिनय आणि डान्स कौशल्याने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे.

Amruta Khanvilkar And Aditi Rao: मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar)ने आपल्या अभिनय आणि डान्स कौशल्याने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. अमृताने हिंदी टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेता हिमांशू मल्होत्रा (Himanshu Malhotra) सोबत लग्नगाठ बांधली आहे. दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावते. अमृता सोशल मीडियावर सक्रीय असून ती चाहत्यांना अपडेट देत असते. दरम्यान अमृताने नुकतचं ती दिल्लीत एका कार्यक्रमासाठी गेली असताना तिची आणि अदिती राव (Aditi Rao) यांची खास भेट झाली. या खास भेटीचे क्षण फोटोमध्ये कॅप्चर करत तिने दोघींचा फोटो आपल्या सोशल मीडियावर शेयर केला आहे.


अदिती आणि अमृता या दोघी फॅशनच्या सोबतीने अभिनय आणि फिटनेस मधून सगळ्यांना प्रेरणा देत असतात आणि या दोघींची भेट म्हणजे ” दोन सुपर टॅलेंटड ” अभिनेत्रीची ग्रेट भेट आहे असं म्हणणं वावग ठरणार नाही. दोघी त्यांच्या प्रेक्षकांना कायम मनोरंजन करत असतात वैविध्यपूर्ण भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात घर करून जातात. अमृता आणि अदिती या दोघी या फोटो मध्ये कमालीच्या सुंदर दिसतात! ही जोडी प्रेक्षकांना एकत्र बघायला आवडेल का? असा प्रश्न देखील निर्माण झाला आहे.

‘झी मराठी’ वाहिनीवर गेल्या काही दिवसांपूर्वी नवाकोरा कार्यक्रम ‘ड्रामा ज्युनिअर्स’ सुरू झाला आणि अल्पावधीत काळातच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. या कार्यक्रमात लहान मुलांचा उत्कृष्ट असा अभिनय पाहायला मिळत आहे. या लहान अतरंगी मुलांचं परीक्षण करण्याची जबाबदारी अभिनेत्री अमृता खान व अभिनेता संकर्षण कऱ्हाडे यांच्यावर असून ते उत्तमरित्या पेलत असल्याचे पाहायला मिळत आहेत.

रेड गाऊनमध्ये Amruta Khanvilkar च्या अदा; पाहा चाहत्यांना घायाळ करणारे फोटो

अदिती राव हैदरी ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. सध्या अदिती तिच्या हिरामंडी या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. अलिकडेच प्रदर्शित झालेल्या हिरामंडी सीरिजमधील अदितीच्या कामाचं सर्वत्र कौतुक होत आहे. या वेब सीरिजमध्ये तिने बिब्बोजान ही भूमिका साकारली आहे. अदितीने बॉलिवूडसोबतच दाक्षिणात्य सिनेसृष्टीतही काम केलं आहे.

follow us